परभणी : (प्रतिनिधी) आ.डॉ.राहुल पाटील यांच्या संकल्पनेतून दिनांक २२ फेब्रुवारी रोजी परभणी मेडिकल कॉलेज आर.पी.हॉस्पिटल एंड रिसर्च इंस्टिट्यूट येथे सकाळी 9 वाजता मोफत बाल हृदयविकार व 2 D इको तपासणी, शस्त्रक्रिया शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे.अशी माहीती मेडिकल कॉलेजचे अधिष्ठाता डॉ.प्रमोद शिंदे यांनी दिली आहे.
या शिबिरामध्ये शून्य ते १८ या वयोगटातील लहान मुलांची 2D इको तपासणी करण्यात येणार आहे तसेच. गंभीर हृदय रोग असलेल्या मुलांच्या मोफत हृदय शस्त्रक्रिया करण्यात येणार आहेत. या मुलांची तपासणी व शस्त्रक्रिया जगप्रसिद्ध बाल हृदय रोग तज्ज्ञ ( paediatric cardiologist) डॉ. भूषण चव्हाण यांच्या हस्ते होणार आहे या पूर्वी वंदनीय बाळासाहेब ठाकरे आरोग्य अभियान अंतर्गत आ. डॉ राहुल पाटील यांच्या वतीने आजपर्यंत जवळपास 500 ते 600 बालकांवर मुंबई येथे यशस्वी हृदय शस्त्रक्रिया होऊन ते आज निरोगी जीवन जगत आहेत
आता परभणीतील हृदय रोग असलेल्या बालकांना मुंबई .पुणे, व इतर कोठेच जाण्याची गरज भासणार नाही
आता सर्व हृदय शस्त्रक्रिया परभणी येथील आर.पी. हॉस्पिटल येथेच जगप्रसिद्ध बालहृदय रोगतज्ञ डॉ.भूषण चव्हाण हे करणार असून सर्व हृदय शस्त्रक्रिया मोफत होणार आहेत तरी ज्या बालकांना हृदयरोग संबंधी समस्या जाणवत असतील त्या बालकांनी या शिबिराचा लाभ घ्यावा असे आवाहन आमदार डॉ. राहुल पाटील व परभणी मेडिकल कॉलेज चे अधिष्ठाता डॉ.प्रमोद शिंदे व सुरज सेवाभावी संस्थेचे संस्थापक अध्यक्ष राहुल कांबळे यांनी केले आहे.शिबिर नाव नोंदणी साठी
राहुल कांबळे 9823211010 यांच्याशी संपर्क करावा असे आवाहन करण्यात आले आहे.


