परभणी प्रतिनिधी) तथागत गौतम बुद्धांच्या ज्ञान प्राप्तीचे बौद्धांचे पवित्र स्थळ असलेले महाबोधी महाविहार ब्राम्हणाच्या कब्जातून मुक्त व्हावे या साठी बौद्धगया येथे सुरू असलेल्या भिक्खू संघाच्या आमरण उपोषणाला पाठिंबा म्हणून आज परभणी जिल्हाधिकारी कार्यालयावर विविध धार्मिक सामाजिक आंबेडकरवादी पक्ष संघटनांच्या वतीने धरणे आंदोलन करण्यात आले.
या धरणे आंदोलनातून जिल्हाधिकारी यांच्यामार्फत देशाचे राष्ट्रपती यांना निवेदन पाठवण्यात आले. दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, १८९१ मध्ये धम्मपाल अनागरिक यांनी महाबोधी महाविहार मुक्ती साठी आंदोलन केले. त्यानंतर बरीच वर्ष देशभरात भदंत नागार्जुन सुरेश ससाई यांनी हे आंदोलन पुढे चालवले. परंतु अद्यापही हे महाविहार बौद्धांच्या ताब्यात नाही. सदरील कमिटीत १९४९ कायद्यात दुरुस्ती करून संपूर्णतः बौद्ध अनुयायी यांचा समावेश करावा अशी मागणी करण्यात आली आहे.
या धरणे आंदोलनात पू.भदंत मुदितानंद थेरो, घनशाम साळवे, कचरूदादा गोडबोले,गोपीनाथ कांबळे,गौतम मुंडे,संजय बगाटे, रानुबाई वायवळ धम्मदिप रोडे,गौतम भराडे,उमेश शेळके,सुहास पंडित यशवंत मकरंद,रंजीत मकरंद, प्रमोद कुटे,सूनित्ता साळवे,सुनील पवार,एम एम भरणे, एम एम बरे,राहुल साळवे धोडिराम खेडकर,भगवान जगताप, सतीश भिसे, अंतीका भराडे, नामदेव ढेपे सचिन पाचपुंजे चंद्रकांत लहाने, बापूराव मोरे चक्रवर्ती वाघमारे, प्रमोद लाटे मिलिंद घुसळे श्याम मोरे मनोज कांबळे धम्मदीप मोगले वैजनाथ गोवाडे रंजना जल्लारे गयाबाई लहाने एन बी पगारे सविता खोब्रागडे, पवन घाडगे ,शेषराव जिल्हारे संदीप खाडे एन डी अभोरे, महेंद्र सानके अतुल वैराट, मनोज कांबळे,दासराव कोंडके शाहीर भगवान वाघमारे भारतीताई राऊत प्रज्ञाताई जडे सोपान सीताफुले, यांच्यासह विविध धार्मिक सामाजिक आंबेडकरवादी राजकीय पक्ष संघटनांचे पदाधिकारी कार्यकर्ते सहभागी होते. (छाया संजय घनसावंत)


