परभणी, ( प्रतिनिधी ) परभणी शहरात जिल्ह्यासाठी नियोजन भवन उभारले जाणार आहे.आ.डॉ.राहुल पाटील यांनी मागील वर्षभरापासून यासाठी राज्य शासनाकडे पाठपुरावा सुरु केला होता.अखेर त्यांच्या प्रयत्नाला यश आले असून शासनाने परभणीसाठी नियोजन भवन मंजुर केले आहे.त्यासाठी 16.63 रुपयांचा खर्च करण्यास मान्यता दिली आहे.त्यासोबतच कामगार भवन देखील मंजुर झाले असुन त्यासाठी 14 कोटी 58 लाख रुपयांचा निधी मंजुर झाला आहे.
जिल्हा नियोजन समितीने ऑगस्ट 2024 दरम्यान 24.91 कोटी रुपयांचे नियोजन भवन उभारण्याकरता शासनाकडे प्रस्ताव सादर केला होता,त्यासाठी आ.पाटील यांनी सातत्याने शासनाकडे पत्रव्यवहार केला होता.तसेच नियोेजन विभागाच्या अधिकाऱ्यांसोबत बैठका घेतल्या होत्या.त्यामुळे शासनाने आज दिनांक 25 मार्च 2025 रोजी नियोजन विभागाचे उपसचिव खेडेकर यांनी शासन निर्णय क्रमांक डीएपी /प्रक्र 250 /का १४८१ प्रमाणे शासन निर्णय जाहीर केला. परभणी येथे नियोजन भवनात तळमजला अधिक दोन मजले अशी रचना असून जागा उपलब्ध असल्याने तात्काळ विकास कामास सुरुवात करण्यात येणार आहे, एचपीसी कमिटीने 16.63 रुपयांचा खर्च करण्यास मान्यता दिली आहे.
*कामगार भवन मंजुर*
परभणी जिल्ह्यात कामगारांची संख्या मोठी आहे.त्यांच्यासाठी विविध योजना राबवल्या जातात.परंतु कार्यालय खाजगी जागेत व अडगळीच्या ठिकाणी असल्याने कामगारांना योजनांचा लाभ घेताना मोठ्या अडचणींना सामोरे जावे लागत आहे.त्यामुळे बाल भवनच्या धर्तीवर वसमत रस्त्यावर जिल्हा ग्रंथालयाच्या परिसरात शासकीय जागेत कामगार भवन स्थापन करावे अशी मागणी आ.पाटील यांनी शासनाकडे केली होती.त्यासाठी कामगार मंत्री आकाश फुंडकर यांना एक फेब्रुवारी रोजी पत्र दिले होते.कामगार भवनसाठी निधी मंजुर करावा अशी मागणी केली होती.त्यानुसार आ.पाटील यांच्या मागणीची दखल घेत शासनाने ताक्ताळ परभणीसाठी कामगार भवन मंजुर केले आहे.त्यासाठी 14 कोटी 58 लाख रुपयांचा निधी मंजुर झाला आहे.


