परभणी,(प्रतिनिधी) : श्रीराम जन्मोत्सव सोहळ्याच्या निमित्ताने 6 एप्रिल रोजी श्रीराम जन्मोत्सव समितीच्या वतीने परभणी शहरातून भव्य शोभायात्रा काढण्यात येणार आहे.
सार्वजनिक श्रीराम जन्मोत्सव समितीचे यंदाचे हे 12 वे वर्ष आहे. समस्त परभणीकरांच्या वतीने दरवर्षी श्रीराम जन्मोत्सव मोठ्या प्रमाणावर साजरा होतो आहे. या पार्श्वभूमीवर गुरुवार 27 मार्च रोजी स्टेशन रस्त्यावरील लक्ष्मी नारायण मंदिराच्या सभागृहात पूर्व तयारी व नियोजनाच्या दृष्टीने सार्वजनिक श्रीराम जन्मोत्सव समितीच्या सर्व सदस्यांची व्यापक बैठक आयोजित करण्यात आली होती.
या बैठकीमध्ये दरवर्षीप्रमाणे याही वर्षी प्रभू श्रीरामाचा जन्मोत्सव अतिशय उत्साहात आणि मोठ्या थाटामाटात साजरा करण्याचे ठरवण्यात आले. प्रभू श्री रामाच्या जन्मोत्सवानिमित्त निघणार्या या शोभा यात्रेमध्ये प्रभू श्रीराम लल्लाटी सुबक मनमोहक मूर्ती व भारतभरामधील विविध राज्यातून कलापथकांचे व विविध सांस्कृतिक देखावे परभणीकर श्रीराम भक्तांना पाहण्यास मिळणार आहेत. तसेच शोभा यात्रेमध्ये ढोल ताशा पथक, शिवकालीन मर्दानी खेळांचे पथक, लेझीम, मल्लखांब पथकांचा देखील समावेश असणार आहे. यंदाचा श्रीराम जन्मोत्सव अतिशय थाटामाटात आणि उत्साहात साजरा होणार आहे.
या सोहळ्याच्या यशस्वी आयोजनासाठी सार्वजनिक श्रीराम जन्मोत्सव समितीचे सर्व सदस्यांनी पूर्वतयारी सुरु केली आहे. कार्यकर्ते कामाला लागले आहेत, अशी माहिती सार्वजनिक श्रीराम जन्मोत्सवाचे संयोजक सदस्यांनी दिली.
Friday, July 18
ताज्या बातम्या:
- निवडणूक कालावधीत उत्कृष्ट वार्तांकन केलेल्या पत्रकारांचा जिल्हाधिकारी रघुनाथ गावडे यांच्या हस्ते सन्मान
- कृषि पंप योजनेवरुन सरकारला धरले धारेवर ; आ.डॉ.राहुल पाटील विधानसभेत आक्रमक-लक्षवेधीद्वारे वीज समस्यांकडे वेधले सरकारचे लक्ष
- संबर येथील अपहरण आणि खून प्रकरणातील पाच आरोपी जेरबंद ; स्थानिक गुन्हा शाखा व परभणी ग्रामीण पोलिसांची संयुक्त कारवाई
- उद्यापासूनच जिल्ह्यातील कॅनॉल व माजलगाव धरणात पाणी सुटणार; जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांची बैठकीत माहिती
- पालकाच्या मृत्यूप्रकरणात निवेदन सादर करा; आ.डॉ राहुल पाटील यांच्या प्रश्नावर विधानसभा अध्यक्षांच्या सूचना
- भाजपा जिल्हाध्यक्ष शिवाजी भरोसे यांचा मदतीचा हात; ह.भ.प. जगन्नाथ महाराज हेंडगे मृत्यू प्रकरणातील पीडित कुटुंबास दोन लाखांची आर्थिक मदत
- जायकवाडी डाव्या कालव्या मार्फत शेतीसाठी पाणी सोडावे युवक काँग्रेसची मागणी
- आ राजेश विटेकर यांनी विधान सभेत उपस्थित केलेल्या पॉईंट ऑफ इन्फॉर्मेशन वर कार्यवाही