परभणी( प्रतिनिधी ) शासनाने केलेल्या पीक कापणी प्रयोगात पिकांचे उत्पन्न कमी आलेले आहे मात्र कंपनीने केलेल्या पीक कापणी प्रयोगात उत्पन्न जास्तीचे आलेले आहे, कंपनीच्या म्हणण्याप्रमाणे शेतकरी व लोकप्रतिनिधींनी दबाव टाकून कमी उत्पन्न निघाल्याचे दाखवले आहे ते मान्य नाही असे कारण दाखवून icici लोंबार्ड कंपनीने शेतकऱ्यांना पीकविमा देण्यासाठी चालवलेली बनवा बनवी कृषिमंत्री माणिकराव कोकाटे यांनी फेटाळून लावली, जर शेतकरी व लोकप्रतिनिधी यांनी दबाव टाकून कमी उत्पन्न दाखवले आहे अशी तक्रार तुम्ही त्याचवेळी जिल्हाधिकारी यांच्या कडे नोंदवली होती का ? तसेच एखाद्या ठिकाणी तसा प्रकार झाला असेल असे आपण मान्य केले तरी सर्व जिल्ह्यात तसे प्रकार झाले होते याला पुरावे काय आहेत, त्यामुळे कंपनीच्या म्हणण्यात तथ्य नाही, आज शेतकऱ्यांना पीकविमा आर्थिक मदत वाटप करायची वेळ आली की अशी बनवा बनवी आठवते काय ? असे फटकारत कृषी मंत्री माणिकराव कोकाटे यांनी ICICI लोंबार्ड कंपनीचे विरोधात त्या 43960 शेतकऱ्यांच्या बाजूने सक्षम बाजू मांडून आर्थिक मदत मिळवून द्या असे निर्देश कृषी आयुक्त यांना दिले परभणी जिल्ह्यातील पीकविमा वाटप प्रकरणी आ राजेश विटेकर यांनी केलेल्या मागणीवरून कृषीमंत्री माणिकराव कोकाटे यांनी आज त्यांच्या दालनात बैठक आयोजित केली होती.

20 ऑक्टोबर रोजी 7952 शेतकऱ्यांनी लेखी तक्रारी कंपनीकडे नोंदविल्या होत्या परतू पाऊस 19 तारखेला झाला होता असे कारण दाखवून कंपनीने त्या फेटाळल्या होत्या , त्या कंपनीला मान्य कराव्या लागतील कारण पाऊस झाल्याच्या 72 तासाच्या आत त्या नोंदवल्या गेलेल्या आहेत, ती तांत्रिक बाजू मान्य करून त्या सर्व तक्रारी मान्य करण्यात येतील असे कंपनीने सांगितले , नावातील मिस मॅच, आधार कार्ड जोडणी नसणे , बँक खाते लिंक नसणे किंवा इतर तांत्रिक गोष्टीमुळे रद्द केलेल्या तक्रारी मान्य करण्यासाठी जिल्हा कृषी अधीक्षक यांनी जिल्हाधिकारी यांच्या सोबत बैठक घेऊन त्या त्रुटी दुरुस्त करून घ्याव्यात , त्या त्रुटीच्या नावाखाली शेतकऱ्यांना वेठीस धरू नका असे निर्देश मां मंत्री यांनी जिल्हाधिकरी व कृषी अधीक्षक यांना बैठकीतच दिले , जिल्ह्यात मंजूर झालेले क्लेम व नामंजूर झालेले क्लेम यांच्या याद्या कंपनीने जाहीर कराव्यात अशा सूचना जिल्हाधिकारी यांनी 7 मे 2025 च्या बैठकीत ICICI लोंबार्ड कंपनीस दिलेल्या होत्या, त्या गाव स्तरावर प्रकाशित करण्यात याव्यात असेही ते म्हणाले बँकांनी विविध कारणावरून होल्ड लावून पीकविमा रक्कम अडवून ठेवली आहे ती रक्कम तात्काळ त्या त्या शेतकऱ्यांना वाटप करावी तसे आदेश कृषिमंत्री साहेब यांनी जिल्हाधिकारी परभणी व व्यवस्थापक लीड बँक परभणी यांना यांना दिले

पीक कापणी चा दुसरा हप्ता राज्य व केंद्र शासनाकडे प्रलंबित आहे राज्य शासन व केंद्र शासन यांनी ती प्रलंबित रक्कम शासनाने मंजूर करून आयसीआयसीआय कंपनीकडे वर्ग करावी व कंपनीने त्यांचा हिस्सा टाकून ते पैसे वाटप करावेत. असा मागणी केली असता शासनाने आजच राज्यातील शेतकऱ्यासाठी 1 हजार कोटी रुपये मंजूर केले असून लवकरच त्याची प्रक्रिया सुरू होणार आहे जिल्ह्यातील 9323 शेतकऱ्यांना त्याचा लाभ होईल असे कृषी संचालक विनय औटी म्हणाले या बैठकीस कृषी मंत्री माणिकराव कोकाटे यांच्या समक्ष आ राजेश विटेकर, एकनाथराव साळवे, किशोर ढगे पाटील, अर्जुन साबळे , कल्याण राव साबळे, गोपीनाथ शिंदे, यांनी बैठकीत विविध मुद्दे मांडून icici लोंबार्ड कंपनीचे मनमानी कारभाराच्या विरोधात आवाज उठवला आ रत्नाकर राव गुट्टे व जिल्हाधिकारी ऑनलाईन द्वारे बैठकीस उपस्थित होते तर या बैठकीस कृषी सचिव, कृषी आयुक्त सूरज मांढरे, कृषी संचालक विनय औटी ICICI लोंबार्ड कंपनीचे व्हाइस प्रेसिडेंट मिहिर,वरिष्ठ व्यवस्थापक खाडे जिल्हा कृषी अधीक्षक दोलतराव चव्हाण यांच्या सह इतर प्रमुख अधिकारी उपस्थित होते


