परभणी (परभणी) परभणी जिल्ह्यातील दुष्काळ सदृष्य परिस्थिती पाहता कार्यकारी अभियंता जायकवाडी पाटबंधारे विभाग दोन यांना जायकवाडी डाव्या कालव्या मार्फत शेतीसाठी पाणी सोडावे असे निवेदन युवक काँग्रेसचे अध्यक्ष अमोल जाधव व शिष्ट मंडळाने केले. सदरील निवेदना मध्ये सांगितले आहे कि, परभणी जिल्हात बहुतांश ठिकाणी खरिपाच्या पेरण्या झालेल्या आहेत, परंतु मागण्चा ऐक महिण्यापासुन पावसाने दांडी मारल्यामुळे पिकांचे पाण्यावाचुन आतोनात नुकसान होत आहे, खात्यातील पिकांचे व बागायतीचे नुकसान थांबवण्यासाठी पाण्याची अत्यंत गरज पाहता आपण जायकवाडी डाव्या कालव्या मार्फत शेतीच्या पाण्यासाठी आवर्तन सोडुन शेतकऱ्यांना नैसगिक संकटातुन बाहेर काढावे.अशी मागणी केली आहे

सदरील निवेदन देताना युवक जिल्हा अध्यक्ष अमोल जाधव, कृषी उत्पन्न बाजार समितीचे उपसभापती अजयराव चव्हाण, युवा काँग्रेस सचिव प्रदेश वैजनाथ देवकते, जिल्हा सरचिटणीस प्रदीप सोनटक्के, दिगंबरराव खरवडे पाटील, रोहिदास बोबडे पाटील, पांडुरंग करटुले, सुहास पंडित सर कृष्णा सवंडकर बाबासाहेब मोरे मनोहर खटे उद्धव मस्के मधुकर मोरे हनुमान शेळके महादेव माने सुनील मोरे रामभाऊ सुक्रे इत्यादी युवक काँग्रेसचे पदाधिकारी होते.


