परभणी ( प्रतिनिधी ) परभणी जिल्ह्यातील सेलू पाथरी ,सोनपेठ अशा महत्वाच्या शहरांना जोडणाऱ्या 548b या महामार्गाचे काम सुरू झाले असून कार्यारंभ आदेश देण्याच्या तारखे पासून दोन वर्षाच्या कालावधीत हे काम पूर्ण होणार आहे अशी माहिती सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्र राजे यांनी आ राजेश विटेकर यांनी विधानसभेत विचारलेल्या प्रश्नावर दिली
देवगाव फाटा ते इंजेगाव या रस्त्याची लांबी ७०.९० कि. मी असून या रस्त्याच्या निविदेमध्ये आर. बी. घोडके इन्फ्रास्ट्रक्चर प्रायव्हेट लिमिटेड ही कंपनी पात्र ठरली आहे त्यांना Letter of Appointment (कार्यारंभ आदेश) देण्यात आले आहेत
देवगाव फाटा ते इंजेगाव (लांबी ७०.९० कि. मी) रस्ता पूर्ण करण्याकरिता Letter of Appointment (कार्यारंभ आदेश) दिल्या पासून २ वर्षाचा कालावधी लागणार आहे. रस्ता दर्जेदार व्हावा यासाठी रस्त्याचे बांधकाम MORTH, IRC, Specifications मधील तरतुदीनुसार करण्यात येऊन कामाची गुणवत्ता राखण्यात येईल, उक्त रस्त्याच्या बांधकामाची गुणवत्ता तपासण्यासाठी राष्ट्रीय महामार्ग विभागाच्या अधिकाऱ्यासोबत स्वतंत्र तांत्रिक सल्लागार (Authority Engineer) यांच्या नेमणुकीसाठी निविद प्रक्रिया प्रगतीपथावर आहे.
महामार्ग NH 548B चे कन्स्ट्रक्शन काम सुरू झाले असून त्याचे तीन टप्पे निर्धारित करण्यात आले आहेत, त्यातील प्रत्यक्षात दोन मध्ये काम सुरू झाले आहेत
या कामाचे तीन टप्पे असून देवगाव ते डिग्रस (सेलू) 15.00km, सेलू ते बोरगव्हाण (पाथरी) 14.90km व पाथरी ते धामोनी (परळी) 41.00km असे ते टप्पे असतील प्रत्येक टप्यात 5-6km चे काम सुरू होईल त्या नंतर ते वाढेल, या कामाचा मेंटेनन्स पिरियड10 वर्ष असून या कामासाठी एकूण खर्च 791 करोड 33 लाख रुपये असेल , प्रत्येक किलोमीटर साठी 11 करोड 16 लाख असा खर्च येणार आहे या कामाची समाप्ती 2027 अखेर पूर्ण करणे आवश्यक राहणार आहे अशी माहिती आ राजेश विटेकर यांनी दिली


