परभणी (प्रतिनिधी) डिजिटल मीडिया परिषदेच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या छत्रपती संभाजी नगर येथील राज्यस्तरीय अधिवेशनासाठी परभणी जिल्ह्यातून 100 पत्रकार सहभागी होणार असल्याची ग्वाही उपस्थित पत्रकारांनी दिली आहे.
परभणी डिजिटल मीडियाच्या वतीने14 सप्टेंबर 25 रोजी छ. संभाजीनगर येथे होणाºाा एक दिवसीय अधिवेशनाच्या पूर्वतयारी निमित्त बैठक संपन्न झाली. त्या बैठकीच्या अध्यक्षांनी अखिल भारतीय मराठी पत्रकार परिषदेचे राज्य सरचिटणीस श्री सुरेश नाईकवाडे यांची उपस्थिती होती तर प्रमुख अतिथी म्हणून जिल्हा मराठी पत्रकार परिषदेचे जिल्हाध्यक्ष श्री प्रभू दीपके उपस्थित होते. यावेळी संघाचे कोषाध्यक्ष मोईन खान, उपाध्यक्ष विठ्ठलराव वडकुते, प्रसिध्दी प्रमुख सुधाकर श्रीखंडे, माणिक शिंदे, आनंद पोहनकर, तैयब पठाण,तसेच जिल्हा व महानगरचे सर्व पदाधिकारी यांचे उपस्थिती होती.
14 सप्टेंबर रोजी संभाजीनगर येथे होणाऱ्या अधिवेशनात डिजिटल मीडियाच्या सर्व पदाधिकाऱ्यांनी उपस्थित राहण्याचे आवाहन मराठी पत्रकार परिषदेचे सरचिटणीस प्रा सुरेश नाईकवाडे यांनी केले या वेळी उपस्थित पत्रकारांनी 100 हुन अधिक संख्येने जाण्याचा निर्धार केला ..तसेच डिजिटल मीडियाच्या सर्व पत्रकार बांधवांना उपस्थित मान्यवरांच्या हस्ते डिजिटल मीडिया परिषदेचे ओळखपत्र वाटप करण्यात आले.
बैठकीचे प्रास्ताविक परभणी महानगर अध्यक्ष राहुल वहिवाळ यांनी केले तर उपस्थितांचे आभार कार्याध्यक्ष अमर गालफाडे यांनी मानले. या वेळी शेख परवेज, शेख इस्माईल, शेख अतिख, तयब पठाण, संजय घनसावंत राजू कडीर्ले, सय्यद अथर, संदीप लहाने, डिजिटल मीडियाचे मोठया संख्येने पत्रकार उपस्थित होते


