परभणी,(प्रतिनिधी) ःसरसकट सर्वच मंडळे अतिवृष्टीग्रस्त म्हणून जाहीर होणे गरजेचे असताना परभणी तालुक्यातील झरी,टाकळी कुंभकर्ण या मंडळांना वगळण्यात आले आहे.या मंडळात देखील खूप नुकसान झाले आहे त्यामुळे या दोन्ही मंडळाचा अतिवृष्टीग्रस्त मंडळात समावेश करा अशी मागणी आमदार डॉ.राहुल पाटील यांनी केली आहे.
परभणी जिल्ह्यात सर्वच मंडळात अतिवृष्टी झालेली आहे.परभणी तालुक्यात सातत्याने अतिवृष्टी होऊन पिकांचे अतोनात नुकसान झाले आहे. अनेकांच्या घराची पडझड झाली आहे. सरसकट सर्वच मंडळे अतिवृष्टीग्रस्त म्हणून जाहीर होणे गरजेचे असताना परभणी तालुक्यातील झरी, टाकळी कुंभकर्ण या मंडळांना वगळण्यात आले आहे. वास्तविक याच मंडळात सर्वाधिक पाऊस झाला झरी मंडळातील झरीसह मांडवा, जलालपूर, मिर्झापूर, नांदापूर आदी भागात सोयाबीन,कापूस, तुर या पिकांचे मोठे नुकसान झाले आहे. पिके संपूर्णतः वाया गेली आहेत. टाकळी कुंभकर्ण या मंडळात देखील पिके हातची गेली आहेत. त्यामुळे शेतकरी हवालदील झाला आहे अशा परिस्थितीत शेतकऱ्यांना तातडीने मदतीची गरज आहे असे आमदार पाटील यांनी जिल्हाधिकारी यांना दिलेल्या निवेदनात नमुद केले आहे. त्यामुळे आपण आपल्या स्तरावरून नव्याने अहवाल तयार करून झरी आणि टाकळी मंडळाचा अतिवृष्टी ग्रस्त मंडळात समावेश करून शेतकऱ्यांना न्याय द्यावा अशी मागणी यात करण्यात आली आहे.यावेळी सदाशिव देशमुख, संदीप झाडे,बंडुनाना बिडकर,उत्तम मुळे,उमेश देशमुख,मोईन पटेल,रामा कदम,शिवाजीराव चोपडे गंगाधर गाडगे शेख खाजा कृष्णा गलांडे ज्ञानेश्वर खनपटे आदी उपस्थित होते.


