परभणी/प्रतिनिधी,:- मैत्री करुणा मुदिता हा धम्माचा पाया आहे.धम्माचे चार ही स्तंभ भिक्खू भिक्खूनी उपासक उपासिका यांच्या विनयशील आचरणाने बुद्ध शासन शक्य असल्याचे प्रतिपादन त्रिपिटकाचे अभ्यासक पूज्य भिक्खू अभिभु गुणानंद यांनी केले.
धम्म मैत्री संवाद अभियान आयोजित संपन्न झालेल्या बोधिपथ धम्मक्रांती महोत्सवात त्यांनी उपस्थितांना धम्म देसना देताना संबोधित केले.
पुढे बोलतांना ते म्हणाले की तथागत बुद्ध चक्रवर्ती सम्राट अशोक व डॉ बाबासाहेब आंबेडकरांनी केलेल्या धम्मक्रांतीचे चक्र गतिमान करण्यासाठी बुद्ध शासनात आपण प्रत्येकांनी सदगामी धम्मधर व्हावे असे ही ते म्हणाले. प्रारंभी डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या पूर्णाकृती पुतळ्यासमोर अभिवादन करून कार्यक्रमाचे अध्यक्ष गौतम मुंडे यांच्या हस्ते पंचरंगी धम्मध्वज दाखवून धम्म रैली काढण्यात आली. धम्म रॅलीतील देखावा आकर्षण ठरला.
उद्घाटकीय मनोगत मिलिंद सावंत यांनी केले तर अध्यक्षीय समारोपात बोलतांना गौतम मुंडे म्हणाले की,बुद्ध आणि बाबासाहेबांचा विचार घेऊन विविध उपक्रमांनी समाजात जागृती निर्माण करण्याच्या धम्म मैत्री संवाद अभियानाच्या प्रयत्नांना आपण बळ दिले पाहिजे.
या वेळी विचारमंचावर उद्घाटक मिलिंद सावंत,स्वागताध्यक्ष सुरेश हिवराळे,भारतीय बौद्ध महासभेचे जिल्हाध्यक्ष अशोक कांबळे, गौतम भराडे,बिट्टू दातार,सुनिता साळवे, डॉ भारत भाग्यवंत, ताराताई खंदारे,उपस्थित होते.
उपस्थित मान्यवरांच्या हस्ते धार्मिक सामाजिक कार्याबद्दल उपासिका आशाताई संभाजी खिल्लारे यांना धम्मपाल अनागरिक धम्मरत्न पुरस्कारने गौरविण्यात आले. या पुरस्काराच्या मनपत्राचे वाचन सुरेश हिवराळे यांनी केले.
प्रास्ताविक व सूत्रसंचालन संजय बगाटे यांनी तर आभार प्रा अतुल वैराट यांनी मानले.
धम्मरैली व बोधिपथ धम्मक्रांती महोत्सव यशस्वी करण्यासाठी बौद्धचार्य एम एम बरे,सुनील पवार, प्रा वाय आर कुऱ्हाडे,सुरेश मस्के, सुमित्रा लझडे, भूषण मोरे, सुदामराव तूपसुंदरे संजीव अढागळे ,राहुल घनसावंत,समीर रोडे,रवी वाहूळे,भास्कर देवरे,रणखांबे बाई रेखाताई खंदारे कमलबाई गायकवाड सिद्धार्थ घोडके, रवी पंडित यांनी परिश्रम घेतले.


