परभणी, (प्रतिनिधी)ःआधुनिक तंत्रज्ञानामुळे शेतीत उत्पन्न वाढत आहे त्यामुळे आपल्या भागातील शेतकऱ्यांनी ए आय या तंत्रज्ञानाचा वापर करून आपले उत्पन्न दीडपट करावे असे आवाहन आ.डॉ.राहुल पाटील यांनी केले
तालुक्यातील पिंगळी बाजार येथील श्रीक्षेत्र गोकुळनाथ येथे पिंगळी विभागातील ऊस उत्पादक शेतकऱ्यांसाठी श्रीलक्ष्मी नृसिंह शुगर्सच्या वतीने बुधवार दिनांक 8 ऑक्टोबर रोजी परिसंवाद आयोजित करण्यात आला होता. यावेळी आ.पाटील बोलत होते या मेळाव्याला ज्येष्ठ संचालक न. ची. जाधव, जनरल मॅनेजर सुभाष सोलव, मुख्य शेती अधिकारी तुळशीराम अंभोरे, ऊस विकास अधिकारी समर्थ अवचार, गंगाधर शिरपूरकर, ऊस पुरवठा अधिकारी नवनाथ कराळे, भूषण चांडक , विनायक पवार,उत्तमराव मुळे, सदाशिव देशमुख, गंगाधर गाडगे, तानाजीमामा भोसले, अशोकराव गरूड, अंबादासराव गरूड, बाळासाहेब गरूड, जगन्नाथ लाला गरूड, अगद गरूड, सरपंच भानुदास डुब्बे, संभानाथ लोखंडे,अंगद गरुड रामकिशन गरूड,रमेश शेरे, नागनाथ देशमुख, राजु टोंग, माणीक भालेराव, रमेश धस, लक्ष्मण भालेराव, राम कदम, संदीप झाडे,बंडू नाना बिडकर,बाळासाहेब डुकरे, शरद देशमुख, उमेश देशमुख, सुरेश जाधव, नारायण देशमुख, शिवदास लोखंडे, तुकाराम चव्हाण, रामकिशन गरूड, सुधाकर ढगे, शिवाजीराव चोपडे, मोईन पटेल, नागेश देशमुख, केशव माने यांच्यासह ऊस उत्पादक शेतकरी उपस्थित होते.
पुढे बोलताना आमदार पाटील म्हणाले सर्वच क्षेत्रात तंत्रज्ञान पुढे गेले आहे. शेती क्षेत्रात देखील विविध प्रकारचे तंत्रज्ञान आले आहे. यामुळे उत्पन्नात वाढ होत आहे. आपल्या भागातील शेतकऱ्यांनी एआय या तंत्रज्ञानाचा वापर करून आपले उत्पन्न दीडपट करावे, श्रीलक्ष्मी नृसिंह शुगर्सच्या माध्यमातून शेतकऱ्यांना लागेल ते तंत्रज्ञान आपण उपलब्ध करून देणार आहे. पिंगळी व परिसरात उसाचे उत्पादन वाढावे यासाठी शेतकऱ्यांनी उसाची लागवड करावी असे आवाहन आ.पाटील यांनी केले. परभणी जिल्ह्यात धवल क्रांती केली जाणार आहे त्यासाठीच मानवत येथे दूध संकलन केंद्र उभारण्यात आले आहे.याच बरोबर 25 हजार लिटरचे संकलन होत आहे.एक लाख लिटर दुधाचे संकलन करण्याचा प्रयत्न असून शेतकऱ्यांनी शेतीला जोड व्यवसाय म्हणून दुग्ध व्यवसाय करावा असे देखील आवाहन आमदार पाटील यांनी यावेळी केले. दुग्ध व्यवसाय करणाऱ्या पशुपालकांना सवलतीच्या दरात गोठे देण्यात येणार आहेत.तसेच पुढील वर्षीपासून कारखान्याच्यावतीने उस उत्पादक शेतकऱ्यांना कर्ज,उस रोपे,रासायनीक खते देखील देण्यात येणार आहे अशी माहीती आमदार पाटील यांनी दिली. या शेतकरी मेळाव्यात कारखान्याच्या वतीने मार्गदर्शन करण्यात आले.मोठ्या संख्येने उस उत्पादक शेतकरी उपस्थित होते.


