परभणी, (प्रतिनिधी) : परभणी जिल्ह्यातील गाव व पाड्यांना पाणीपुरवठा सुरळीत, नियमित व गुणवत्तापूर्ण व्हावा, यासाठी आवश्यक ती सर्व कामे वेळेत आणि दर्जेदार पद्धतीने पूर्ण करावीत, अशा सूचना पाणीपुरवठा व स्वच्छता राज्यमंत्री तथा परभणी जिल्ह्याच्या पालकमंत्री मेघना साकोरे-बोर्डीकर यांनी दिल्या.
मुंबई येथील निर्मल भवन येथे परभणी जिल्ह्यातील पाणीपुरवठा विषयक आढावा बैठक मंगळवारी (दि. 14) आयोजित करण्यात आली होती. यावेळी त्या बोलत होत्या. यावेळी महाराष्ट्र जलजीवन मिशनचे व्यवस्थापकीय संचालक ई. रवींद्रन उपस्थित होते. दूरदृष्टी संवाद प्रणालीद्वारे बैठकीत परभणी जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी नीतीशा माथुर तसेच संबंधित अधिकारी सहभागी झाले होते.
या बैठकीमध्ये जलजीवन मिशन, जिल्हा परिषद आणि महाराष्ट्र जीवन प्राधिकरण (एमजेपी) अंतर्गत राबविण्यात आलेल्या योजनांचा योजना-निहाय सविस्तर आढावा घेण्यात आला. ज्या योजना अपूर्ण आहेत त्या तत्काळ पूर्ण कराव्यात, तसेच ज्यांच्या सुधारित अंदाजपत्रकांची गरज आहे ती त्वरित मंजुरीसाठी सादर करावीत, अशा स्पष्ट सूचना राज्यमंत्री मेघना साकोरे-बोर्डीकर यांनी दिल्या.
तसेच वस्सा, आडगाव, आसेगाव, दुधगाव या गावांसह १०० योजनांना फेरमान्यता देण्याबाबत निर्देश दिले. वाडी व तांडे यांचे अंदाजपत्रकेही लवकर पाठवावीत, असे सांगत परभणी जिल्ह्यातील नागरिकांना शुद्ध, स्वच्छ आणि पुरेशा प्रमाणात पाणी मिळेल याची खात्री करण्याचे सूचना त्यांनी संबंधित अधिकाऱ्यांना दिल्या.
अधिकाऱ्यांनी परभणी जिल्ह्यातील प्रकल्पांची सद्यस्थिती, प्रलंबित कामे तसेच पुढील नियोजन याबाबत सविस्तर माहिती सादर केली. राज्यमंत्री श्रीमती बोर्डीकर यांनी सर्व संबंधित विभागांना एकत्रित समन्वय ठेवून नागरिकांच्या पाणीपुरवठ्याशी संबंधित तक्रारींचे त्वरित निवारण करावे अशा सूचना दिल्या.
००००
Thursday, May 21
ताज्या बातम्या:
- परभणी जिल्हा पुन्हा भगवामय करणार – आमदार डॉ राहुल पाटील यांचा निर्धार : शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाच्या नूतन पदाधिकाऱ्यांचा सत्कार
- चाळीशीत वाढताहेत ‘हार्ट अटॅक’चे प्रमाण; आर.पी. हॉस्पिटलचा ‘TMT’ उपक्रम अवघ्या ३०० रुपयांत
- नानलपेठ पोलीस ठाण्यात २४ बेवारस दुचाकी वाहनांचा २८ मे रोजी जाहीर लिलाव
- पत्रकार विजयकुमार मुंदडा यांचे अपघाती मृत्यु प्रकरणाचा जलद गतीने तपास करा; वसमत रोडवरील अपघात रोखण्यासाठी उपाययोजना करण्याची पत्रकारांची मागणी
- राष्ट्रीय स्पर्धेसाठी डॉ. पंकज खेडकर यांची परीक्षक म्हणुन निवड* ; पुण्यात रंगणार ‘भारत उत्सव २०२६’चा सोहळा; लोककला आणि अभिनयाचा अविष्कार
- ज्येष्ठ पत्रकार विजयकुमार मुंदडा यांचे अपघाती निधन ; गंगाखेड येथे अंत्यसंस्कार
- निर्वाचित पक्ष, गट व अपक्षांसाठी महत्त्वाची सूचना: ११ मेपूर्वी आघाडी नोंदणी आवश्यक
- परभणीत 7 मे रोजी गुरव समाजातर्फे वधू-वर परिचय मेळावा व मौंजी संस्कार कार्यक्रम


