परभणी (प्रतिनिधी) स्थानिक स्वराज्य संस्थेची निवडणूक ही कार्यकर्त्यांची आहे. कार्यकर्त्यांच्या निवडणुकीत मी तन-मन धनाने त्यांच्यासोबत खंबीरपणे उभा राहणार आहे. सर्व मतभेद विसरून एकजुटीने या निवडणुकीत आपल्या पक्षाची ताकद दाखवावी असे आवाहन आ.डॉ. राहुल पाटील यांनी केले.
स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणूक संदर्भात आ.डॉ.राहुल पाटील यांच्या उपस्थितीत आढावा बैठक पार पडली. या बैठकीला मतदारसंघातील सर्व प्रमुख पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.
यावेळी बोलताना आमदार पाटील म्हणाले माझ्या निवडणुकीत जीवाचं रान करणाऱ्या कार्यकर्त्यांची निवडणूक आता होणार आहे. त्यामुळे मी देखील त्यांच्या निवडणुकीसाठी अहोरात्र काम करून त्यांना विजय मिळवून देणार तन-मन-धनाने कार्यकर्त्यांच्या पाठीशी उभा राहणार, कार्यकर्ता ताठ मानेने जगला पाहिजे, तो सक्षम झाला पाहिजे आणि तो निवडूनही आला पाहिजे हीच आपली भूमिका आहे. एवढे दिवस तुम्ही आमच्यासाठी काम केले आता मी माझी निवडणूक समजून कार्यकर्त्यांना निवडून आणणार असा निर्धार आमदार पाटील यांनी केला.
पक्षाचे सर्व कार्यकर्ते पदाधिकारी यांनी आपले मतभेद बाजूला ठेवावेत आणि स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीत आपल्या प्रत्येक उमेदवाराला निवडून आणण्यासाठी सहकार्य करावे असे आवाहन आ.पाटील यांनी केले महानगरपालिका, जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकीत विजय मिळवायचा असेल तर आपल्याला एकत्र होऊन एक दिलाने काम करावे लागेल आणि ते आपण करणार आहोत असे स्पष्ट केले.
उमेदवारी देताना कार्यकर्त्यांची निष्ठा, प्रामाणिकपणा आणि जनमानसातील प्रतिमा हे पाहूनच आपण उमेदवारीचा विचार करणार आहोत त्यामुळे कोणीही नाराज होऊ नये, ज्यांना उमेदवारी मिळाली नाही अशांनी स्वतः उमेदवार समजून त्या उमेदवाराला निवडून आणण्याची जबाबदारी घेतली पाहिजे
परभणी विधानसभा मतदारसंघात आपल्या पक्षाचे संघटन मोठे आहे त्यामुळे त्याचा निश्चित आपल्याला लाभ होणार हे देखील त्यांनी सांगितले .
यावेळी शिवसेना महिला आघाडी युवा सेना, शिक्षक सेना,कामगार सेना,ज्येष्ठ नागरिक मंच अशा सर्व आघाड्यांचे पदाधिकारी कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
Sunday, February 8
ताज्या बातम्या:
- ज्येष्ठ पत्रकार नितीन धूत यांना सर्व पत्रकारातर्फे श्रद्धांजली अर्पण
- संत श्री गजानन महाराज प्रगट दिनानिमित्त विविध कार्यक्रम; आत्मोन्नती प्रतिष्ठानचा उपक्रम
- शेतकरी व पशुपालकांना केंद्रबिंदू ठेवून प्रदर्शनाची तयारी करा- पशुसंवर्धन मंत्री पंकजा मुंडे
- मारोतराव लोमटे यांचे निधन
- ज्येष्ठ पत्रकार नितीन धूत यांची उद्या परभणीत शोकसभा
- यशस्वीतेसाठी कठोर परिश्रम आवश्यक- सर्वेश काबरा
- जिल्हा परिषद व पंचायत समिती च्या मतदानासाठी कामगारांना भरपगारी सुट्टी
- केंद्रीय अर्थसंकल्पातून महाराष्ट्राला ऐतिहासिक निधी;, पायाभूत सुविधा व ऊर्जेला नवी दिशा — राज्यमंत्री मेघना बोर्डीकर


