परभणी (प्रतिनिधी) राज्य क्रीडा व युवक सेवा संचालनालय महाराष्ट्र राज्य अंतर्गत मा.उपसंचालक ,संभाजी नगर विभाग यांच्या निर्देशानुसार पार पडलेल्या विभागीय 14 वर्ष *मुले-मुली खो- खो स्पर्धेत* *बाल विद्यामंदिर प्रशालेच्या* *दोनही संघाने* निर्विवाद वर्चस्व गाजवून राज्यस्तरीय स्पर्धेसाठी निवड झाली आहे.
सदरील स्पर्धा शिवाजी महाविद्यालय,परभणी या ठिकाणी दि.26 ऑक्टोम्बर रोजी संपन्न झाली.छत्रपती संभाजी नगर,बीड,जालना, आणि हिंगोली जिल्ह्याचा समावेश होता.
सदरील स्पर्धा अतिशय चुरशीच्या झाल्या,यामध्ये 14 वर्ष मुलींच्या संघाने जालना संघाला पराभूत करून बाजी मारली,तर मुलांच्या 14 वर्ष वयोगटात मुलांचा अंतिम सामना छत्रपती संभाजी नगर संघासोबत होऊन आपले वर्चस्व सिध्द केले .प्रशालेचे दोनही संघ राज्यस्तरीय स्पर्धेसाठी पात्र ठरले आहेत. बाल विद्यामंदिर शिक्षण संस्थेचे अध्यक्ष डॉ.नंदकुमार झरकर ,उपाध्यक्ष ऍड. विलासजी पोहंडुलकर सचिव डॉ. विवेकजी नावंदर ,सहसचिव ऍड.संजय औंढेकर सन्माननीय सदस्यां डॉ. सौ आनिताताई नावंदर, पवनकुमार झानंजरी आणि बाबा विहिटकर तसेच मुख्याध्यापक अरुण बोराडे, उपमुख्याध्याक.रामदास तुंम्मेवार,पर्यवेक्षक तथा विभाग प्रमुख प्रदीप रुघे, बळीराम कोपरटरकर यांनी दोन्ही संघातील खेळाडूंचे तसेच त्यांना मार्गदर्शन करणारे खो खो चे राष्ट्रीय खेळाडू तथा प्रशालेचे क्रीडाशिक्षक श्प्रभाकर गमे ,तसेच ज्ञानेश्वर पंडित .संतोष देशमुख यांचे अभिनंदन केले .14 वर्षे मुले गटात
अस्मित रमेशराव पवार(कर्णधार), श्रीनिवास, अविनाश दुधाटे,पृथ्वीराज चक्रधर देसाई, सोहम विश्वनाथ पांचाळ,अभंग दीपक देशमुख , अभिराज जगन्नाथ रोडगे, प्रितेश जगन्नाथ खरवडे, रितेश जगन्नाथ खरवडे ,आदेश अतुल लोणारी, कौस्तुभ शिवप्रसाद गुंगे, ऋषीकेश जगदीश माने, श्रीहरी गजानन झाडे, ईश्वर संतोष बोराळकर , गोविंद अजय शर्मा , राज बालासाहेब जावळे तसेच 14 वर्षे मुली गटात
वेदिका नंदकुमार आंबोरे(कर्णधार), निकिता सचिन पवार,राजनंदिनी चक्रधर देसाई, वेदिका विजयराव मुंढे, आराध्या जगन्नाथ रोडगे, खुशी रतन भरोसे, राशी रतन भरोसे , राणी विठ्ठल भालेराव, कल्याणी मनोहर हानेगावकर , तन्वी दिलीपराव काळे, अनघा दत्तराव यादव, प्रज्ञा उदय देशपांडे, शर्वरी अमृत कदम, श्रुती प्रसाद पांचाळ,वसुंधरा सचिन पवार या खेळाडूंचा समावेश आहे.श्रीमती कीर्ती आलेगावकर व पारडे मॅडम यांचे सहकार्य लाभले.पुढे होणाऱ्या राज्यस्तरीय स्पर्धेसाठी शुभेच्छा दिल्या आहेत.


