परभणी (प्रतिनिधी) महाराष्ट्र राज्याच्या विधानसभेचे सलग तिसºयांदा नेतृत्व करणारे तसेच वरीष्ठ सदस्य, परभणी विधानसभा मतदार संघाचे शिवसेना ठाकरे गटाचे आ. डॉ. राहुल पाटील यांची नागपूर येथील संपूर्ण हिवाळी अधिवेशनासाठी तालीका सभापती म्हणून नियुक्ती झाली आहे.
तालिका सभापतींची नियुक्ती ही विधानसभेचे सभापती करतात.आ.डॉ.राहुल पाटील हे सलग तिसºयांदा परभणी विधानसभा मतदारसंघातून निवडून आले असून सभागृहाचे जेष्ठ सदस्य आहेत.
प्रत्येक अधिवेशनात मतदारसंघासह विविध प्रश्नांवर अभ्यासपूर्ण मांडणी आ. पाटील यांनी केली आहे.
नागपूर हिवाळी अधिवेशनात सभापती राहुल नार्वेकर यांनी तालिका सभापती म्हणून आमदार डॉ. पाटील यांच्या नावाची घोषणा केली. परभणी विधानसभेला आ. डॉ. पाटील यांच्यामुळे प्रथमच हा बहुमान मिळाला आहे. याबद्दल आमदार पाटील यांचे सर्व स्तरातून अभिनंदन होत आहे.
*तालिका सभापतींचे कर्तव्य*
सभागृहाचे कामकाज चालवण्यासाठी मुख्य सभापतींच्या अनुपस्थितीत त्यांची जबाबदारी पार पाडण्यासाठी निवडलेल्या सदस्यांना तालिका अध्यक्ष किंवा तालिका सभापती असे म्हणतात. ही निवड करण्यामागचा उद्देश सभागृहाचे कामकाज कोणत्याही अडथळ्याशिवाय सुरू ठेवणे हा असतो. तालिका सभापती हे सभागृहातील महत्त्वाचे सदस्य असतात, जे मुख्य सभापतींच्या गैरहजेरीत पीठासीन अधिकारी म्हणून काम करतात आणि सभागृहाचे कामकाज सुरळीत चालवतात. तालिका सभापती विधानसभा अध्यक्षांना सभागृह चालवण्यात सहाय्य करतात. याशिवाय कामकाज कोणत्या क्रमाने घ्यायचे याची योजना तयार करण्यात त्यांची महत्वपूर्ण भुमिका असते. तसेच नियम व प्रक्रिया योग्य प्रकारे पाळल्या जात आहेत याची खात्री करण्याची जिम्मेदारी तालिका सभापती यांच्यावर असते.
Sunday, February 8
ताज्या बातम्या:
- ज्येष्ठ पत्रकार नितीन धूत यांना सर्व पत्रकारातर्फे श्रद्धांजली अर्पण
- संत श्री गजानन महाराज प्रगट दिनानिमित्त विविध कार्यक्रम; आत्मोन्नती प्रतिष्ठानचा उपक्रम
- शेतकरी व पशुपालकांना केंद्रबिंदू ठेवून प्रदर्शनाची तयारी करा- पशुसंवर्धन मंत्री पंकजा मुंडे
- मारोतराव लोमटे यांचे निधन
- ज्येष्ठ पत्रकार नितीन धूत यांची उद्या परभणीत शोकसभा
- यशस्वीतेसाठी कठोर परिश्रम आवश्यक- सर्वेश काबरा
- जिल्हा परिषद व पंचायत समिती च्या मतदानासाठी कामगारांना भरपगारी सुट्टी
- केंद्रीय अर्थसंकल्पातून महाराष्ट्राला ऐतिहासिक निधी;, पायाभूत सुविधा व ऊर्जेला नवी दिशा — राज्यमंत्री मेघना बोर्डीकर


