परभणी,(प्रतिनिधी) : महानगरपालिकेच्या सार्वत्रिक निवडणूकीत एकूण 16 प्रभागातील 65 जागांकरीता अर्ज दाखल केलेल्या इच्छुकांपैकी एकूण 97 उमेदवारांचे अर्ज छाननी प्रक्रियेतून बाद झाले आहेत.
महानगरपालिकेतील 5 निवडणूक निर्णय अधिकार्यांनी बुधवारी छाननीची प्रक्रिया पूर्ण केली. परंतु, त्या छाननी प्रक्रियेतून अवैध ठरलेल्या नामनिर्देशन पत्रांची संख्या बुधवारी रात्री उशीरापर्यंत माध्यमांच्या प्रतिनिधींना दिली नाही. गुरुवारी सायंकाळी माध्यमांच्या प्रतिनिधींना या अवैध नामनिर्देशन पत्रांची संख्या प्रेसनोटच्या माध्यमातून हाती लागली.
त्याप्रमाणे प्रभाग क्रमांक 1 ब मधून 2, क मधून 5 तर ड मधून 2 असे एकूण 9, प्रभाग 2 ड मधून 1, प्रभाग क्रमांक 3 ब मधून 3, ड मधून 1, असे एकूण 4, प्रभाग 4 क मधून 1, प्रभाग 5 ब मधून 3, क मधून 3 असे एकूण 6, प्रभाग क्रमांक 6 अ मधून 1, प्रभाग क्रमांक 7 अ मधून 1, ब मधून 1, क मधून 11, ड मधून 7 असे एकूण 20, प्रभाग क्रमांक 8 अ मधून 4, ब मधून 5, क मधून 6 व ड मधून 5 असे एकूण 20, प्रभाग क्रमांक 9 अ मधून 1, ब मधून 2, क मधून 2, ड मधून 1 असे एकूण 6, प्रभाग क्रमांक 10 क मधून 1, प्रभाग क्रमांक 12 अ मधून 1, ब मधून 1, ड मधून 1 असे एकूण 3, प्रभाग क्रमांक 14 अ मधून 6, ब मधून 5, क्र मधून 3, ड मधून 6 असे एकूण 20, प्रभाग क्रमांक 15 अ मधून 1, प्रभाग क्रमांक 16 अ मधून 1, ब मधून 1 व ड मधून 1 असे एकूण 3 उमेदवारांचे अर्ज या छाननी प्रक्रियेतून अपात्र ठरविण्यात आले आहेत.
Thursday, May 21
ताज्या बातम्या:
- परभणी जिल्हा पुन्हा भगवामय करणार – आमदार डॉ राहुल पाटील यांचा निर्धार : शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाच्या नूतन पदाधिकाऱ्यांचा सत्कार
- चाळीशीत वाढताहेत ‘हार्ट अटॅक’चे प्रमाण; आर.पी. हॉस्पिटलचा ‘TMT’ उपक्रम अवघ्या ३०० रुपयांत
- नानलपेठ पोलीस ठाण्यात २४ बेवारस दुचाकी वाहनांचा २८ मे रोजी जाहीर लिलाव
- पत्रकार विजयकुमार मुंदडा यांचे अपघाती मृत्यु प्रकरणाचा जलद गतीने तपास करा; वसमत रोडवरील अपघात रोखण्यासाठी उपाययोजना करण्याची पत्रकारांची मागणी
- राष्ट्रीय स्पर्धेसाठी डॉ. पंकज खेडकर यांची परीक्षक म्हणुन निवड* ; पुण्यात रंगणार ‘भारत उत्सव २०२६’चा सोहळा; लोककला आणि अभिनयाचा अविष्कार
- ज्येष्ठ पत्रकार विजयकुमार मुंदडा यांचे अपघाती निधन ; गंगाखेड येथे अंत्यसंस्कार
- निर्वाचित पक्ष, गट व अपक्षांसाठी महत्त्वाची सूचना: ११ मेपूर्वी आघाडी नोंदणी आवश्यक
- परभणीत 7 मे रोजी गुरव समाजातर्फे वधू-वर परिचय मेळावा व मौंजी संस्कार कार्यक्रम


