परभणी (प्रतिनिधी) येथील ज्येष्ठ पत्रकार नितीन धूत यांचे दिनांक 3 फेब्रुवारी रोजी जिंतूर तालुक्यातल्या गणेशपुर जवळ झालेल्या भीषण अपघातामध्ये दुःखद निधन झाले त्यांना आज दि 5 रोजी परभणी येथे अतिथी हॉटेल येथे सर्व पत्रकार बांधवांच्या वतीने आदरांजली वाहण्यात आली

स्टेडियम परिसरातील अतिथी हॉटेल येथे सकाळी बारा वाजता आयोजित करण्यात आलेल्या कार्यक्रमात आज बहुसंख्येने पत्रकार उपस्थित होते यावेळी सुरुवातीला नितीन धूत यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करण्यात आला त्यानंतर अनेक पत्रकारांनी त्यांच्या सोबतच्या आठवणी यावेळेस व्यक्त केल्या त्यानंतर दोन मिनिटं स्तब्ध राहून नितीन धूत यांना अभिवादन करण्यात आले यावेळी बहुसंख्येने पत्रकार उपस्थित होते



