परभणी ( प्रतिनिधी) महाराष्ट्र नर्सेस असोसिएशन परभणी विभागाच्या वतीने आज जिल्हा सामान्य रुग्णालयात शहरी आणि ग्रामीण भागातील नर्सेस यांच्या ज्ञानात भर पडावी आणि रुग्णांना वैद्यकीय सेवा देताना कार्यकुशलता यावी या भावनेने एकदिवसीय सी एन ई /सी पी डी क्रेडिट 10 पॉईंट कार्यशाळेचे आयोजन 6 मार्च रोजी जिल्हा सामान्य रुग्णालयातील सभागृहात करण्यात आले होते. या कार्यक्रमाला प्रमुख उपस्थिती म्हणून जिल्हा शल्य चिकित्सक नागेश लखमावार, वैद्यकीय अधीक्षक तथा अतिरिक्त जिल्हा शल्य चिकित्सक डॉ सारिका बडे ,

डॉ फैजलं सर, मुख्य आधिसेविका मीनाक्षी सूर्यवंशी, स्त्री रुग्णालयाच्या सहाय्यक अधीसेविका चंदा राणी लेमाडे, अस्थिवेंग रुग्णालयाच्या सहाय्यक अधिक सेविका मीना देशमुख, प्रभारी आदी सेविका सुनंदा हटकर, प्रिन्सिपल मानकर मॅडम मनोरुग्णविभागाच्या परिसेविका हरणे मॅडम, प्रशिक्षण केंद्राच्या शिरसाट मॅडम परिसेविका रंजना जोंधळे,
माधुरी सूर्य रुग्णालयाच्या परिसेविका होळकर मॅडम , कार्यशाळेचे मार्गदर्शक शाकीर सर, नर्सेस असोसिएशन परभणी अधक्षा सुजाता कांबळे , अजित जोंधळे इमरान मोमीन,रमा हनवते,कविता नागोरे,नम्रता मकासरे,स्वप्निल राऊत ,अर्जुन मुंडे यांची उपस्थिती होती.
यावेळी बोलताना जिल्हा शल्यचिकित्सक लखमवार म्हणाले की परिचारिका या आरोग्य सेवेचा आत्मा आहेत , वैद्यकीय सेवा देणे हे त्यांचे फार महत्वाचे आणि जिकरी चे काम आहे व नियमित जबाबदारी चे काम आहे, अनेक वेळा फक्त परिचारिका यांनी दिलेल्या प्राथमिक उपचाराने रुग्णाचे प्राण वाचतात , त्यांनी दिलेल्या प्राथमिक उपचाराने बऱ्याच होणाऱ्या वाईट घटनाही दूर होतात आणि मृत्यू दर ही कमी होतो नर्सेस यांनी सातत्याने ज्ञान प्राप्त केले पाहिजे, रुग्णांना आपण कोणते औषध दिले त्याचे परिणाम दुष्परिणाम काय आहेत याची माहिती असणे गरजेचे आहे, असं म्हणत त्यांनी सर्वांना शुभेच्छा दिल्या.
यावेळी उपस्थित सर्वच मान्यवरांनी मनोगत व्यक्त केले.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन रमा हनवते यांनी केले तर आभार विश्वजित मठपती यांनी मानले, कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी महाराष्ट्र नर्सेस असोसिएशन परभणी विभागातील जितेंद्र टोम्पे, सुशील हजारे,गोविंद पाळवदे, शाकीर सर आणि सर्वच पदाधिकारी, सदस्य यांनी परिश्रम घेतले आहेत, यावेळी कार्यशाळेसाठी मोठ्या संख्येने ग्रामीण आणि शहरी भागातील सर्वच परिचारिका भगिनी मोठ्या संख्येने उपस्थित होत्या.


