परभणी ( प्रतिनिधी) आज भारत मुक्ती मोर्चा आणि राष्ट्रीय पिछडा वर्ग OBC मोर्चा यांच्या वतीने संपूर्ण देशभर OBC समाजाची जातीनिहाय जनगणना करण्यात यावी आणि UGC कायद्याच्या समर्थनार्थ धरणे आंदोलन व निवेदन देण्यात आले.
देशातील OBC समाजाला त्यांच्या लोकसंख्येच्या प्रमाणात न्याय मिळावा, शैक्षणिक व सामाजिक हक्कांचे योग्य प्रतिनिधित्व मिळावे यासाठी जातीनिहाय जनगणना अत्यंत आवश्यक आहे. तसेच शिक्षण क्षेत्रातील समानता व हक्क अबाधित राहावेत यासाठी UGC कायद्याचे संरक्षण व समर्थन करणे गरजेचे आहे.
याच मागण्यांसाठी आज देशभरातील विविध जिल्ह्यांमध्ये आंदोलन करून शासनाला निवेदन देण्यात आले. समाजाच्या हक्कांसाठी सुरू असलेली ही लढाई पुढेही तीव्र स्वरूपात सुरू राहील. यावेळी ॲड विनोद अंभोरे, जी एस जडे, बाळासाहेब लंगोटे पाटील, सुभाष साडेगावकर, बबन भंडारे, ॲड संदेश वाघमारे, विष्णू कांबळे छाया : संजय घनसावंत)


