परभणी, (प्रतिनिधी) परभणी पाथरी रस्त्यावरील आर.पी. हॉस्पिटल अँड रिसर्च इन्स्टिट्यूट येथे नुकतेच अत्याधुनिक फिजिओथेरपी सेंटर व मराठवाड्यातील पहिले स्पाइनल डिकॉम्प्रेशन युनिटचे उद्घाटन महाविद्यालयाचे संस्थापक आ. डॉ राहुल पाटील यांचे हस्ते करण्यात आले.
या वेळी प्रमुख अतिथी म्हणून वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. इंद्रमनी, डॉ विवेक नावंदर महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ.प्रमोद शिंदे, वैद्यकीय अधीक्षक डॉ. अमीर तडवी रामराव डोंगरे यांची उपस्थिती होती.
यावेळी बोलताना डॉ. राहुल पाटील म्हणाले की,या अत्याधुनिक सुविधेच्या माध्यमातून परभणी व मराठवाडा विभागातील रुग्णांना दर्जेदार उपचार मिळतील असे सांगितले.
डॉ. प्रमोद शिंदे यांनी या नव्या सुविधेबाबत सविस्तर माहिती देताना सांगितले की, स्पाइनल डिकॉम्प्रेशन युनिट हे मराठवाड्यातील पहिले असे युनिट आहे. यामध्ये पाठीच्या कण्यासंबंधित समस्या, डिस्क प्रोलॅप्स, नर्व्ह कॉम्प्रेशन, सायटिका आदी आजारांसाठी नॉन-सर्जिकल, अत्याधुनिक उपचार उपलब्ध होणार आहेत. तसेच फिजिओथेरपी सेंटरमध्ये आधुनिक उपकरणे, व्यायाम सुविधा आणि तज्ज्ञ फिजिओथेरपिस्ट्सची टीम रुग्णांच्या पुनर्वसनासाठी कार्य करेल असा विश्वास व्यक्त केला यावेळी महाविद्यालयातील अधिकारी कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.


