परभणी ( प्रतिनिधी) परभणी जिल्ह्यातील जागृत देवस्थान असलेले यशवाडी येथील मंदिराचा सभामंडप कोसळून झालेली दुर्घटना या अत्यंत दुर्दैवी असून प्रशासन स्तरावर लागणारे सर्व मदत देण्याचे सांगण्यात आल्याची खासदार संजय जाधव यांनी सांगितले
ही घटना अत्यंत दुर्दैवी असून मृत्युमुखी पडलेल्या सर्व भाविकांच्या कुटुंबात दुःखात मी सहभागी आहे. जिल्हाधिकारी, जिल्हा शल्य चिकित्सक यांच्याशी माझे बोलणे झाले असून शासन स्तरावर लागणारे सर्व मदत देण्याचे त्यांना सांगण्यात आले आहे असे संजय जाधव यांनी सांगितले.


