परभणी (प्रतिनिधी) मा. पंतप्रधानांच्या निवासस्थानासमोर काँग्रेस पक्षाने केलेल्या आंदोलनाचा निषेध करण्यासाठी भारतीय जनता पार्टी परभणी महानगर व परभणी ग्रामीणच्या वतीने आज जिल्हा काँग्रेस कार्यालय, शनिवार बाजार, परभणी येथे जोरदार निदर्शने करण्यात आली.
यावेळी केंद्र सरकार व मा. पंतप्रधानांच्या सुरक्षेबाबत कोणतीही तडजोड सहन केली जाणार नाही, असा ठाम संदेश देत काँग्रेस पक्षाच्या भूमिकेचा निषेध करण्यात आला.
या आंदोलनात भारतीय जनता पार्टीचे जिल्हाध्यक्ष श्री. शिवाजी भरोसे व श्री सुरेश भुमरे यांच्या नेतृत्वाखाली मोठ्या संख्येने पदाधिकारी व कार्यकर्ते सहभागी झाले. तसेच भाजपा युवा मोर्चा, महिला मोर्चा, अल्पसंख्याक मोर्चा तसेच पक्षाच्या विविध आघाडी व मोर्चांचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित राहून आंदोलन यशस्वी केले.


