परभणी,(प्रतिनिधी) : परभणी जिल्ह्यातील युवा कुस्तीप्रेमी आणि सामाजिक कार्यकर्ते पैलवान संतोष उर्फ अमोल सोनाजी मोरे यांची महाराष्ट्र कुस्ती संघटनेच्या परभणी जिल्हाप्रमुखपदी निवड करण्यात आली आहे. महाराष्ट्र कुस्ती संघटनेचे पैलवान संग्राम कांबळे यांनी नुकतीच ही घोषणा केली.
पैलवान मोरे यांनी कुस्ती क्षेत्राबरोबरच सामाजिक क्षेत्रातही उल्लेखनीय कार्य केले आहे. जगदंब प्रतिष्ठानचे संस्थापक अध्यक्ष म्हणून त्यांनी परभणी येथे जगदंब कुस्ती संकुल उभारण्याचा संकल्प साकारत जिल्ह्यातील पारंपरिक कुस्तीला नवी दिशा देण्याचे काम हाती घेतले आहे. त्यांच्या नेतृत्वाखाली दरवर्षी निकाली कुस्त्यांच्या भव्य मैदानांचे आयोजन केले जाते. तसेच विविध सांस्कृतिक आणि सामाजिक उपक्रम, रक्तदान शिबिरे, गरीब व गरजू विद्यार्थ्यांना शालेय साहित्याचे वाटप आदी उपक्रम सातत्याने राबविण्यात येतात. याशिवाय होतकरू पैलवानांना खुराकासाठी मानधन व आर्थिक मदत देऊन त्यांना प्रोत्साहन देण्याचे कार्यही ते करत आहेत.
परभणी जिल्ह्यात अधिकाधिक गुणवंत पैलवान घडावेत, कुस्तीची परंपरा अधिक समृद्ध व्हावी आणि नवोदित खेळाडूंना योग्य व्यासपीठ उपलब्ध व्हावे, या उद्देशाने ते सातत्याने प्रयत्नशील आहेत. त्यांच्या निवडीबद्दल जिल्ह्यातील कुस्तीपटू, क्रीडाप्रेमी, सामाजिक कार्यकर्ते तसेच विविध संघटनांच्या पदाधिकार्यांकडून अभिनंदनाचा वर्षाव होत असून त्यांच्या पुढील वाटचालीस शुभेच्छा देण्यात येत आहेत.
Wednesday, July 22
ताज्या बातम्या:
- पैलवान संतोष उर्फ अमोल मोरे यांची महाराष्ट्र कुस्ती संघटनेच्या परभणी जिल्हाप्रमुखपदी निवड
- पत्रकार संघाकडून एसआयआर जनजागृतीसाठी मतदार नोंदणी अर्ज सादर
- १ किलो वजनाच्या नवजात बाळाचा मृत्यूशी लढा यशस्वी; आर. पी. हॉस्पिटलच्या डॉक्टरांनी दिले नवजीवन
- १ किलो वजनाच्या नवजात बाळाचा मृत्यूशी लढा यशस्वी* *आर. पी. हॉस्पिटलच्या डॉक्टरांनी दिले नवजीवन* परभणी दि २२ कमी वजन, अपूर्ण शारीरिक वाढ आणि गंभीर जंतूसंसर्ग अशा अत्यंत चिंताजनक स्थितीत मृत्यूशी झुंज देणाऱ्या अवघ्या १ किलो वजनाच्या नवजात बालकाला आमदार डॉ.राहुल पाटील यांच्या आर.पी. हॉस्पिटलच्या तज्ज्ञ डॉक्टरांच्या टीमने नवजीवन दिले. तब्बल २ महिने चाललेल्या यशस्वी उपचारांनंतर बाळ पूर्णपणे सुदृढ झाले असून, १.८ किलो वजनासह त्याला आज रुग्णालयातून सुखरूप सुट्टी देण्यात आली. वसमत येथील एका आर्थिकदृष्ट्या हलाखीच्या कुटुंबातील मातेची प्रसूती परभणीतील एका खाजगी रुग्णालयात अवघ्या २८ व्या आठवड्यात झाली होती. जन्मतःच बाळाची तब्येत अतिशय नाजूक व चिंताजनक होती आणि त्याला श्वास घेण्यास प्रचंड त्रास होत होता. परिस्थितीचे गांभीर्य ओळखून नातेवाईकांनी बाळाला तत्काळ आर.पी. हॉस्पिटलच्या एन.आय.सी.यू. (NICU) विभागात दाखल केले. रुग्णालयात दाखल केले तेव्हा बाळाची शारीरिक वाढ झालेली नव्हती. कुटुंबाची हलाखीची आर्थिक परिस्थिती लक्षात घेता, डॉक्टरांनी उपचारात कुठलाही विलंब न करता बाळाला तत्काळ व्हेंटिलेटरवर घेतले. सलग २३ दिवस बाळावर व्हेंटिलेटरवर उपचार करण्यात आले. प्रकृतीत सुधारणा झाल्यानंतर त्याला व्हेंटिलेटरवरून ‘सीपॅप’ (CPAP) आणि त्यानंतर ‘हाय फ्लो’ ऑक्सिजनवर ठेवण्यात आले. उपचारादरम्यान बाळाला गंभीर जंतूसंसर्ग झाला होता, परंतु तज्ज्ञांच्या देखरेखीखाली उच्च प्रतीची औषधे देऊन त्यावर यशस्वी मात करण्यात आली. तसेच बाळाला रक्ताची तीव्र कमतरता भासत असल्याने, आर. पी. हॉस्पिटलमधील ‘शांताई ब्लड बँक’ मार्फत मोफत रक्ताच्या ४ बॅग उपलब्ध करून देण्यात आल्या. हा संपूर्ण ६१ दिवसांचा महागडा व गुंतागुंतीचा उपचार ‘महात्मा जोतिराव फुले जन आरोग्य योजना’आणि ‘प्रधानमंत्री जन आरोग्य योजना’ अंतर्गत पूर्णपणे मोफत करण्यात आला. “आमची आर्थिक परिस्थिती अत्यंत बिकट असल्याने बाळावर उपचार कसे करायचे, याची आम्हाला मोठी चिंता होती. परंतु आर. पी. हॉस्पिटलच्या डॉक्टरांनी पैशांचा कोणताही विचार न करता आमच्या बाळावर देवदूतासारखे उपचार केले. अशी प्रतिक्रिया बाळाच्या पालकांनी दिली. उपचारासाठी आर.पी. हॉस्पिटलचे अधिष्ठाता डॉ. प्रमोद शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली बालरोगतज्ज्ञ डॉ. अजय गिरी, डॉ. संतोष बडे आणि डॉ. अकिब बसमा यांच्या मार्गदर्शनाखाली रुग्णालयातील कर्मचाऱ्यांनी परिश्रम घेतले. या कामगिरीबद्दल रुग्णालयाचे प्रमुख आमदार डॉ.राहुल पाटील यांनी सर्व डॉक्टर आणि कर्मचाऱ्यांचे अभिनंदन केले
- भाजपाचे जिल्हा काँग्रेस कार्यालयासमोर आंदोलन
- कबड्डी संघटनेतर्फे खेळाडू आयोग स्थापन करण्याची प्रक्रिया सुरू…. राज्यातील माजी आंतरराष्ट्रीय कबड्डी खेळाडूंना आवहान
- परभणीत ‘राजमाता जिजाऊ’ बससेवेचा दणक्यात शुभारंभ प्रवाशांना अत्याधुनिक प्रवासाची सुविधा: आ.डॉ.राहुल पाटील
- दिव्यांग व्यक्तींनी राष्ट्रीय पुरस्कारांसाठी 31 जुलैपर्यंत ऑनलाइन अर्ज करावेत


