विशेष लेख
भटकंती ची मबभारतातील वैवीध्यपूर्ण संस्कृती, इतिहास, आणी निसर्गाचा आनंद घेण्यासाठी भारत भ्रमण करणे हा उत्तम मार्ग, अतुलनिय भारताच्या ह्या प्रवासात आपण हिमालय च्या सुंदर पर्वत रांगा पासून कन्याकुमारी च्या सागरा पर्यंत आणी राजस्थान च्या वाळवंटा पासून ईशान्य भारतातील हिरव्या गार दऱ्यांचा अनुभव घेऊ शकतो ,
,भारत देश भ्रमण एकूण कालावधी 12/13 वर्ष आणी खर्च एकूण स्व कमाईचा 18 लाख रु खर्च करून पूर्ण भारत भ्रमण मी पूर्ण केले…
सगळा भारताचा नकाशा म्हणलं की डोळ्या समोर दिसतो खूप मोठा विशाल आपला भारत देश, ,अतुल्य भारतातील 28 राज्य व 8 केंद्र शासित प्रदेश, अनेक शहरे, अनेक धार्मिक स्थळें, व अनेक अनेक प्रकारचे किल्ले, राजवाडे, समुद्र किनारे, उंच हिमालय मधील स्थळें, पूर्व ते पश्चिम, उत्तर ते दक्षिण, भारत भ्रमण करताना भारतातील इस्कॉन मंदिर, वारणासी चा गंगा घाट, दक्षिण द्रविड शैली चे मंदिरं, दर्जिलिंग चे टी गार्डन, सिलवासा येथील ओम मंदिर, पाली येथील ओम मंदिर, आणी , इतर जे ही भारत देशात मंदिरे आहेत ते सर्व मी पाहिले व दर्शन घेऊन आलोय,, पश्चिम बंगाल इस्कॉन मंदिर, शांतीवन असो की बेंगलोर, पुणे, तिरुपती असो किंवा भारतातील प्रत्येक शहरातील विविध मंदिरे मी बघितली, , अतिशय सुंदर व सुबक भगवंताच्या मूर्ती मंदिरा मध्ये आहेत व त्या बघायला मिळतात , सर्व शीख गुरुद्वारे, चर्च, बौद्ध स्तूप, लूंबिनी नेपाळ, सारनाथ, कुशीनगर, बौद्ध गया, राजगिर, नालंदा, व जामा मस्जिद, चारमिनार असो की इतर मस्जिद असो, तसेच चर्च गोवा ची असो की पोंडेचेरी केरळ मधील असोत, मी प्रे केले तिथे जाऊन स्वतः, सर्व, किल्ले, राजवाडे, गार्डन, light and साऊंड शो असो की मरुभूमी राजस्थान असो, सर्व मी स्वतः फिरलो अनुभव आणी ज्ञान मध्ये वृद्धी केली,
इतिहासाच्या पाऊलखुणा, संस्कृतीचा संगम, प्राचीन आणि आधुनिक ठिकाणी मी भेटी दिल्या, निसर्ग, निसर्गाची रचना लेक असो की ,कल्चरल प्रोग्राम, अभयारण्ये,गार्डन,झरणे धबधबे, प्राणी संग्रहालय, मी फिरताना एक रोमांचक सफर, साहसी भारत, भारताची अनवट वाट, छोटे मोठे सर्व ठिकाण,भारत दर्शन, माझे अनोखे अनुभव, सर्व काही मी कमी बजेटमध्ये केले, अत्यंत प्रेरणादायी आणि भावनिक, आपला अतुल्य भारत देश एक अद्भुत सफारी, माझी भारत यात्रा मी हिमालय पासून कन्याकुमारी पर्यंत व सेवन सिस्टर पासून ते पोरबंदर ओखा,दिव दमन पर्यंत मी स्वतः प्रवास केलेला आहे,
स्वदेश दर्शन भारताच्या मातीत दडलेले सौंदर्य, भारताची भटकंती एक अविस्मरणीय अनुभव, संस्कृती व इतिहास विविधतेत एकता, भारत भ्रमणाची एक झलक माझ्या भारत यात्रेचे संस्मरण, आज ह्या लेखद्वारे मी माझ्या शब्दातून मांडत आहे, राजस्थान सारखे किल्ले पॅलेस इतर कुठे नाहीत, तर काश्मीर सारखं नैसर्गिक सौंदर्य इतर कूठे नाही, म्हणजे च प्रत्येक राज्य ची आपली एक वेगळी खासियत.. काजू म्हंटल की गोवा. अननस म्हंटल की सिल्चर चे उंच डोंगर आणि चहा म्हंटल की आसाम चे टी गार्डन.. आहे ना देवाची किमया,
भारत भ्रमण, एकाच देशात अनेक देश अनुभवण्या सारखा एक अद्भुत प्रवास आहे, बर्फाच्छादित शिखरे, राजस्थान मधील वाळवंट, केरळ मधील बॅकवॉटर, आसाम मधील चहा चे मळे टी गार्डन , दक्षिण भारतातील गोपूरम , नक्षीदार विशाल मंदिरे, तसेच काश्मीर मधील नैसर्गिक सौंदर्य असे वैविध्यपूर्ण अनुभव भारताच्या यात्रेमध्ये प्रवासा मध्ये मला मिळाले, विविधता इतिहास आणि संस्कृतीचा हा उत्तम मिलाप आहे, जहाज नावं मध्ये मी प्रवास केला 500/700/1000 किमी चा.. अंदमान, लक्षद्विप चा.. अविस्मरणीय समुद्री प्रवास तो माझा, विमान प्रवास 2/3 वेळा केला केवळ..
भारत भ्रमणा मधील काही प्रमुख आकर्षण म्हणजे उत्तर भारतातील, दिल्लीतील ऐतिहासिक वास्तू, आग्रा येथील ताजमहाल, राजस्थान मधील कला,माऊंट अबू येथील नक्की झिल, दिलवाडा जैन मंदिर , रनकपूर, पावापूर, पालिताना चे जैन मंदिरे मी स्वतः जाऊन भगवान महाविर चरणी नत मस्तक होऊन दर्शन घेतले,
अमृतसर चे स्वर्ण मंदिर, भारत पाकिस्तान ची सीमा वाघा आट्टारी बॉर्डर व हिमालयातील सुंदरसे निसर्ग सौंदर्य, दक्षिण भारतातील केरळ,तामिळनाडू आणि कर्नाटक राज्य हंपी,, तामिळनाडू मधील भव्य दिव्य मंदिरे , कला कुसर, संस्कृती आणि निसर्ग सौंदर्याचा अद्भुत अनुभव, पश्चिम भारतातील महाराष्ट्र गुजरात कोकण आणि राजस्थान मधील किल्ले वाळवंट आणि खाद्य संस्कृती, पूर्व ईशान्य भारतामधील अरुणाचल प्रदेश चे नैसर्गिक सौंदर्य, तवांग भारत चायना बॉर्डर, माणिपूर, मेघालय , अननस व चहाचे मळे आणि समृद्ध सांस्कृतिक वारसा लाभलेले ठिकाणे, मित्रहो भारत भ्रमण करताना तुम्हाला काही टिप्स देऊ इच्छितो, प्रवासापूर्वी योग्य नियोजन करावे, भेट देण्याची ठिकाणे जे आहेत त्याचा अभ्यास करावा, राहण्याची सोय खानपान याचा पूर्व अभ्यास करणे, दळण वळण, रेल्वे प्रवास भारत फिरण्यासाठी उत्कृष्ट आणि स्वस्त पर्याय आहे, स्थानिक संस्कृती स्थानिक लोकांच्या खाण्या पिण्याचे, संस्कृती परंपरा जाणून घेण्याचा प्रयत्न करा, भारत भ्रमणामुळे केवळ मनोरंजन च नव्हे तर इतर आपल्याला देशाच्या इतिहासाबद्दल आणि संस्कृती बद्दल खूप काही शिकायला मिळते,
आपला भारत देश हा दक्षिण आशियातील एक प्रमुख देश आहे, 15 ऑगस्ट 1947 रोजी स्वतंत्र झालेला भारत 26 जानेवारी 1950 पासून प्रजासत्ताक बनला हा जगातील सातवा सर्वात मोठा क्षेत्रफळ असलेला आणि सर्वाधिक लोकसंख्येचा देश आहे,
नवी दिल्ली ही भारताची राजधानी असून 28 राज्य आणि केंद्रशासित प्रदेशाचा हा एक संघ आहे,
भारत आशिया खंडाच्या दक्षिणेस असून पश्चिमेस अरबी समुद्र, पूर्वेस बंगालचा उपसागर आणि दक्षिणेस हिंद महासागर आहे, उत्तरेस हिमालय पर्वत रांगा आहेत, विविधतेत एकता हे भारताचे मुख्य वैशिष्ट्य असून येथे अनेक धर्मभाषा, संस्कृती आणि सणवार एकत्र नांदतात, आपला भारत देश की प्राचीन हिंदू संस्कृतीची भूमी असून अनेक थोर राज्य सम्राट आणि थोर पुरुषांचा इतिहास येथे घडला आहे, संस्कृती अध्यात्मिक ज्ञानाचा वारसा लाभलेला एक सामर्थ्यशाली देश म्हणून जगात आपला भारत देश ओळखला जातो, भारताचे प्राचीन आणि जुने नाव जंबुदीप व भारत वर्ष हे देखील होते,
ऐतिहासिक ग्रंथानुसार राजा भरत यांच्या नावावरून या भूमीला भारत म्हटले गेले तसेच आर्य संस्कृती नुसार आर्यवर्त असे संबोधले जात असे,
प्रत्येक राज्यातील प्रत्येक शहरात फिरताना त्या त्या राज्यातील विविधता तेथील मंदिरे अभयारण्य गार्डन किल्ले लेक, राजवाडे, तारांगण, म्युझियम हे सर्व पाहून मला आपल्या देशाचा फार अभिमान वाटला, पर्यटन म्हटले की काही गोष्टी व्यवस्थित प्लॅन केल्यामुळे आणि काही गोष्टी अचानक अनुभवायला मिळाल्यामुळे मनाला खूप छान वाटते,
काश्मीरच्या ट्रिप मध्ये केरळच्या ट्रिप मध्ये अंदमानच्या ट्रिप मध्ये लक्षदीपच्या ट्रीप मध्ये, लेह लड्डाख आणि सेव्हन सिस्टर्स फिरताना मला खूप खूप मनाला आनंद वाटला,
एखादे देऊळ बघायला जावे आणि त्या देवळाच्या पाठीमागे एखादा खळ खळ वाहणारा धबधबा , किंवा हिरवीगार टेकडी दिसावी मग तिथे रमावे असे मी खूप ठिकाणी अनुभवले, अनेक प्रकारच्या बोली भाषा बोलल्या जातात भारत देशात आपल्या… त्या त्या बोली भाषा मी भारत फिरताना बघताना ऐकल्या सर्व.. समजो, न समजो परंतु किती निर निराळ्या भाषा आहेत हे पण समझले लाईव्ह….. देवाची किमया अतिशय अद्भुत आहे खरोखरच हे 100% च समझते,
एकंदर काय तर भारत भ्रमण मध्ये प्रवास म्हणजे नव्या अनुभवांची पोचडी प्रवासात सोबत घेऊन आपले नाक कान डोळ्यांनी मेंदू उत्सुक ठेवला की अनेक अनुभव घेत आपण शहाणे होऊ शकतो, प्रवास विषयक एक कोटेशन बनवून आपण जेवढे प्रवास करू तेवढे नम्र होतो कारण विविधतेने नटलेल्या मोठ्या जगात आपण किती छोटे आहोत हे आपल्याला समजते,
विज्ञान भूगोल ऐतिहासिक पुस्तके वाचताना पाठ्यपुस्तकात अनेक स्थळाचा उल्लेख येतो यातील काही ठिकाणांची रंजक माहिती मी स्वतः भारत भ्रमण करताना प्रवास करताना मला अनुभवयास मिळाली, बरेच ठिकाण पाहिलेली, ती आठवल्यानंतर मनाला कायम आनंद देत राहतात,
मी भारत भ्रमण करताना टप्प्याटप्प्याने अकरा ते बारा वर्षे प्रवास करून स्व कमाई ने व एकट्याने स्वतःचे 18 लाख रुपये जवळपास खर्च करून मी संपूर्ण भारत देश आपला फिरून, अनुभवाची शिदोरी आज माझ्याजवळ आहे आणि खूप काही भारत देशातील धार्मिक स्थळांची पर्यटन स्थळांची माहिती ज्ञानदेखील माझ्याकडे आहे म्हणजे मला प्राप्त झाले मित्रहो,.. भारत देशातील सर्व नद्या, आणि अरबी समुद्र हिंद महासागर बंगालची खाडी हे सर्व ठिकाणी मी फिरलो, चार धाम यात्रा असो की सर्व शक्तीपीठे सर्व धर्मातील सर्व प्रसिद्ध धार्मिक स्थळे, पर्यटन स्थळे त्या ठिकाणी मी जाऊन आलो मित्रांनो, भारत देशाबद्दल वर्णन करावे तेवढे कमी च आहे, शब्द खूप अपुरे पडतील मित्रहो लिहायचे म्हंटल्यास, पाहुणचार कौटुंबिक मूल्ये,लवचिकता, शिक्षणप्रती आदर, अध्यात्मिकता ,शैक्षणिकता आणि सर्जनशीलता हे सर्व भारतीया मधील सदगुण आहेत, भारताचे चैतन्यमय आणि वैविध्यपूर्ण समाजाच्या जडणघडणीत योगदान देतात,
मला भारत देश का आवडतो कारण की भारताला एक गौरवशाली इतिहास असून प्राचीन संस्कृती लाभलेली आहे, आपले अनेक सण आहेत आणि आपण विविध संस्कृती परंपराचे पालन करतो, उत्तरेकडील हिमालय,पर्वतरांगा आपले रक्षण करतात, भारत अरबी समुद्र, बंगालचा उपसागर, आणि हिंद महासागराने वेढलेला आहे अद्भुत सौंदर्य जंगले, गंगा यमुना सरस्वती या केवळ नद्या नसून त्याचे पाणी अमृत समान आहे, ऋषीमुनींची साधू संताची तपस्वी भूमी, अनेक ठिकाणी गुफे मध्ये साधू संत तपस्या करताना मी पाहिलेत,
उत्तराखंड ही देवभूमी, आणि भूतान व नेपाळ देश हे दोन देश सुद्धा मी भारत भ्रमण सोबतच हे 2 देशही फिरलो मित्रांनो, मन खूप खूप प्रफुल्लित आणी आनंदी झाले, भारत भ्रमण करून भारत देश पाहुन आपला सर्व…. मनात निश्चय केला होता मी भारत भ्रमण करायचे ते मी पूर्ण ही केले ह्याचा मला स्वाभिमान आहे..
. ग्रामीण भागातून अनेक समस्या बाजूला ठेवून, साहस चिकाटी जिद्द अंगी जोपासून एकट्याने भारत भ्रमण मी केले, बघता बघता 28 राज्य व 8 केंद्र शासित प्रदेश अंदमान व लक्षद्विप व भूतान नेपाळ देशात ही 2 /3 वेळा जाऊन तेथील मंदिर, स्तूप व निसर्ग खूप जवळून पाहावयास मिळाला मला, अरुणाचल प्रदेश तवांग असो की, नाथुला पास, बुमला पास, सेला पास, झोजीला पास, असे अनेक रोमांचक रस्ते तेथून प्रवास करताना चा थरारक अनुभव अविस्मरणीय च, काश्मीर मधील निसर्ग स्वर्ग च जणू…केरल चे अतिशय सुंदर हिरवेगार वातावरण, बॅक वॉटर, थंड हवा,स्वर्ग च जणू काही धरती वर…इतके विहंगम नजारे केरळ मध्ये पाहावयास मिळतात, हत्ती जास्त केरल आणि आसाम राज्य मध्ये live बघावयास मिळतात
गुजरात मधील कछ जुनागढ गिरनार परिक्रमा, इत्यादी..
. हिमाचल मधील देवदर्शन हिमालय पर्वत अतिशय विहंगम नजारे बघत च राहावे आणी अंगाला शहारा यावा असे काही ठिकाणे सुद्धा पाहायला मिळाले… भारत भ्रमण करताना समुद्र मधील जलचर प्राणी अनेक प्रकार च्या फिशेस, स्कुबा डायविंग करताना व स्नोरकेलिंग करताना कोरल्स असो की स्टार फिश, डॉल्फिन माश्या इत्यादी live डोळ्यांनी पाहावयास मिळाले. मी पाहिले.., पाईन, देवदार, चीड, अँपल चे झाडे
विविध प्रकारचे वृक्ष, वनस्पती, पशु,पक्षी प्राणी,वनस्पती, झाडे, फुले, फळाच्या बागा, अनेक वृक्ष,जे कधीच पाहायला मिळाले नाहीत ते बघण्याचे भाग्य ही मला लाभले,, सर्व काही ईश्वराची कृपा च भारत भ्रमण करताना ईश्वर कृपे शिवाय भारत भ्रमण होणे शक्य नव्हते…शरीर सदृढ असणे तर आवश्यक आहेच परंतु ईश्वराच्या कृपेने च सर्व काही मी फिरू शकलो पाहू शकलो, कुठं पण मला अडचण आली नाही मित्रहो..
… मित्रहो मी आपणास जरूर सांगेन की आपण सुद्धा पर्यटन व धार्मिक स्थळें फिरून यावे. व ज्ञान वाढते खूप प्रवासाने हे नक्कीच सांगेल मी…
काही माहिती हवी असल्यास आपण मला सोशल मीडिया वर व गुगल वर शोधू शकता… भारत भ्रमण किया हुवा युवक हे नावं गुगल वर टाकावे अथवा माझे दोन मोबाईल क्रमांक देखील आपण गुगल वर सर्च डिटेल पाहू शकता
9156438966/9975375264… ओमप्रकाश श्रीनिवास शर्मा.. बोरी. ता -जिंतूर जिल्हा परभणी. महाराष्ट्र….


