परभणी,(प्रतिनिधी) : महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत रविवार 30 ऑगस्ट रोजी येथील इंदिरा गांधी स्टेडियम येथे आयोजित करण्यात येणार्या शेतकरी मेळावा व युवा संवाद मेळाव्याच्या सभामंडपाचे भूमिपूजन सोमवारी शिवसेना जिल्हाप्रमुख आनंदराव भरोसे यांच्या हस्ते करण्यात आले.
शेतकरी व युवकांशी थेट संवाद साधण्याच्या उद्देशाने आयोजित करण्यात येणार्या या मेळाव्याच्या पार्श्वभूमीवर सभामंडपाच्या उभारणीला सुरुवात झाली आहे. मेळाव्यात शेतकरी, युवक तसेच विविध घटकांच्या प्रश्नांवर चर्चा होण्याची शक्यता असून, जिल्ह्यातील नागरिकांकडून या कार्यक्रमाकडे लक्ष लागले आहे. कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी शिवसेनेच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांकडून तयारीला वेग देण्यात आला आहे.
भूमिपूजनप्रसंगी कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती पंढरीनाथ घुले पाटील, माजी शिवसेना जिल्हाप्रमुख गंगाप्रसाद आनेराव, अतुल सरोदे, अनिल कांबळे, माजी जिल्हाप्रमुख व्यंकटराव शिंदे, महानगरप्रमुख माणिक पोंडे, दिलीप अवचार, प्रभाकर कदम, मदन लांडगे, शुभम पाष्टे, आप्पाराव वावरे, सचिन पाटील, रामप्रसाद रनेर, सोपान मोरे, पांडुरंग खिल्लारे, रितेश काळे, दीपक बाराहाते, विजय भालेराव, गोकुळ लोखंडे, रमेश देशमुख, शेख शबीर यांच्यासह शिवसेनेचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.
Monday, August 24
ताज्या बातम्या:
- मुख्यमंत्री सहाय्यता निधी-टाटा ट्रस्टच्या करारातून ‘रूग्णांना’ दिलासा; पहिल्याच करारातून ८९.६० लाखांची मदत
- वॉक फॉर वॉटर’मधून महाराष्ट्रात जलसंधारणाची लोकचळवळ अधिक बळकट – मृद व जलसंधारण मंत्री संजय राठोड
- आनंदराव भरोसे यांच्या हस्ते शेतकरी मेळाव्याच्या सभामंडपाचे भूमिपूजन
- केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले उद्या परभणी दौऱ्यावर
- उत्कृष्ट सार्वजनिक ग्रंथालय व ग्रंथमित्र पुरस्कारासाठी २५ सप्टेंबरपर्यंत प्रस्ताव सादर करण्याचे आवाहन
- जातीय मानसिकतेविरोधात भीमशक्ती आक्रमक; परभणीत मुंडन, पिंडदान व सत्यशोधक यज्ञ
- परभणीत प्रथमच आर.पी.हॉस्पीटल येथील सूक्ष्मजीवशास्त्र प्रयोगशाळेला NABL मानांकन
- भटकंती ची मजा, भारत भ्रमणा चा एक वेगळाच आनंद, मनाला भिडणारा भारत प्रवास – ओमप्रकाश शर्मा


