परभणी, (प्रतिनिधी) शिवसेना नेते तथा युवासेना प्रमुख माजी मंत्री आदित्य ठाकरे यांनी रविवार, दि. २७ सप्टेंबर रोजी टाकळी कुंभकर्ण शिवारात(ता. परभणी) सकाळी १० वाजता खरीप पिकांची पाहणी केली, अन् अडचणीत सापडलेल्या शेतकऱ्यांबरोबर हितगुज केले.
परभणीसह मराठवाड्यात भीषण दुष्काळ पडला आहे.खरीप हंगामातील पिके नष्ट झाली आहेत. जनावरांच्या चारा पाण्याचा देखील प्रश्न गंभीर झाला आहे,या पार्श्वभूमीवर शिवसेना नेते ठाकरे हे रविवारी सकाळी मराठवाड्याच्या पाहणी दौऱ्यावर दाखल झाले. रविवारी सकाळी दहा वाजता परभणी तालुक्यातील टाकळी कुंभकर्ण शिवारात पिक पाहणी केली.पाहणी करून शेतकऱ्यांशी संवाद साधला..
या दौऱ्यात शिवसेना नेते तथा मराठवाडा संपर्क नेते आमदार अंबादास दानवे, परभणी लोकसभा संपर्कप्रमुख प्रदीप कुमार खोपडे,स्थानिक आमदार डॉ. राहुल पाटील, आमदार कैलास पाटील , शिवसेना नेते डॉ. विवेक नावंदर, माजी आमदार सौ. मीराताई रेंगे, शिवसेना जिल्हाप्रमुख विष्णू मुरकुटे, जिल्हाप्रमुख रवींद्र धर्मे, सदाशिवराव देशमुख, महापौर सय्यद इकबाल, नंदू अवचार, संजय गाडगे, अनिल डहाळे ,ज्ञानेश्वर पवार ,शिवलिंग बोधने, प्रभाकर जैस्वाल आदी उपस्थित होते.
आजच्या पाहणी दौऱ्यात शेतकरी बांधवांशी संवाद साधताना आदित्यसाहेब ठाकरे यांनी त्यांच्या न्याय्य मागण्यांसाठी सातत्याने पाठपुरावा करण्याची ग्वाही दिली. शेतकऱ्यांना न्याय मिळवून देण्यासाठी सरकारकडे पूर्ण ताकदीने मागणी लावून धरली जाईल. दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांना आश्वासनांची नव्हे, तर त्यांच्या अडचणीच्या काळात प्रत्यक्ष आणि तातडीच्या मदतीची गरज आहे. शासनाने शेतकऱ्यांच्या परिस्थितीचे गांभीर्य ओळखून तात्काळ ठोस निर्णय घ्यावा.
आदित्य ठाकरे हे टाकळी येथून दुपारी १२ वाजता वरफळ, ता. परतूर, जि. जालना येथेही ते दुष्काळग्रस्त भागाची पाहणी करणार आहेत.


