परभणी,(प्रतिनिधी) : शहरातील मोकाट कुत्र्यांची वाढती संख्या लक्षात घेऊन महानगरपालिकेच्या वतीने श्वान निर्बीजीकरण मोहीम सुरू करण्यात आली आहे. शहरातील विविध भागांत मोकाट कुत्र्यांचा वावर वाढल्याने नागरिकांकडून त्यांच्या बंदोबस्ताची मागणी होत होती. या पार्श्वभूमीवर महापालिकेने मोकाट कुत्र्यांना पकडून त्यांचे निर्बीजीकरण करण्याची मोहीम हाती घेतली आहे.
यासाठी विशेष पथक नियुक्त करण्यात आले असून, हे पथक दररोज शहरातील विविध भागांतून मोकाट कुत्र्यांना ताब्यात घेत आहे. त्यानंतर त्यांच्यावर निर्बीजीकरणाची प्रक्रिया केली जात आहे. महापौर सय्यद इकबाल, उपमहापौर गणेश देशमुख, आयुक्त नितीन नार्वेकर आणि स्थायी समिती सभापती प्रतिभा अतुल सरोदे यांच्या सूचनेनुसार ही मोहीम राबविण्यात येत आहे.
Saturday, November 14
ताज्या बातम्या:
- सोमवारी परभणीत ब्रह्मकुमारी शिवानी दीदीचे ‘खुशियों का पासवर्ड’ प्रवचन ; कार्यक्रमास प्रवेश विनामूल्य
- मौलाना आझाद उर्दू प्रायमरी अँड हायस्कूलमध्ये ‘अब्दुल रहमान खान चॅरिटेबल ट्रस्ट’च्या वतीने शालेय गणवेश वाटप
- दुष्काळी परिस्थितीत फायनान्स कंपन्यांची बळजबरीची वसुली थांबवा : शिवसेनेची मागणी; सेलू तहसीलदारांना निवेदन
- भाजपच्या परभणी जिल्हा कोअर कमिटीच्या बैठकीतून जिल्ह्यातील संघटनात्मक कामकाजाचा आढावा : प्रदेश सरचिटणीस सुनील राणे यांची प्रमुख उपस्थिती
- वंदे मातरम् राष्ट्रीय शिबिरासाठी अनुराज रासकटला यांची निवड : रायपूर येथे होणार्या शिबिरात करणार महाराष्ट्राचे प्रतिनिधित्व; परभणीच्या शिरपेचात मानाचा
- ब्रह्मकुमारी शिवानी दीदी यांच्या कार्यक्रमाच्या नियोजनासाठी महापौर सय्यद इकबाल यांच्याकडून स्थळाची पाहणी
- महापालिकेकडून श्वान निर्बीजीकरण मोहिम सुरु ; नागरिकांच्या तक्रारींची दखल
- 34 हजार दुय्यम न्यायालयीन कर्मचारी 17 नोव्हेंबरपासून बेमुदत संपावर : ‘समान काम, समान वेतन’ची प्रमुख मागणी


