परभणी,(प्रतिनिधी) : आंतरराष्ट्रीय प्रेरक वक्ता आणि जीवन व्यवस्थापन विषयातील मार्गदर्शक नारीशक्ती पुरस्कार प्राप्त ब्रम्हकुमारी शिवानी दीदीजी यांचे 16 नोव्हेंबर रोजी परभणीत ‘खुशियों का पासवर्ड’ या विषयावर प्रवचन होणार आहे.
वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठाच्या विद्यार्थी कल्याण कार्यालयासमोरील अश्वमेध मैदानावर सायंकाळी 5.30 ते 6 या वेळेत सांस्कृतिक कार्यक्रम होणार असून त्यानंतर सायंकाळी 6 ते रात्री 8 या वेळेत आनंदी जीवनाचा मार्ग, सकारात्मक विचारांची प्रेरणा देणारा ब्रम्हकुमारी शिवानी दीदी यांचा खुशियों का पासवर्ड हा विशेष कार्यक्रम होणार आहे. यातून त्या सुखी जीवनासाठी सकारात्मक विचार, मनःशांती आणि जीवनाकडे पाहण्याचा योग्य दृष्टीकोन या विषयी मार्गदर्शन करणार आहेत.
ब्रम्हकुमारीज् शिवराम नगर यांच्या वतीने या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. त्यासाठी प्रवेश विनामूल्य असून पूर्वनोंदणी आवश्यक आहे. नोंदणीसाठी omshanti.in/bks या संकेतस्थळाला भेट द्यावी, अधीक माहितीसाठी 9420965874 किंवा 8446430244 या क्रमांकावर संपर्क साधावा. नागरीकांनी वेळेत उपस्थित राहून कार्यक्रमाचा लाभ घ्यावा, असे आवाहन आयोजकांनी केले आहे.
Saturday, November 14
ताज्या बातम्या:
- सोमवारी परभणीत ब्रह्मकुमारी शिवानी दीदीचे ‘खुशियों का पासवर्ड’ प्रवचन ; कार्यक्रमास प्रवेश विनामूल्य
- मौलाना आझाद उर्दू प्रायमरी अँड हायस्कूलमध्ये ‘अब्दुल रहमान खान चॅरिटेबल ट्रस्ट’च्या वतीने शालेय गणवेश वाटप
- दुष्काळी परिस्थितीत फायनान्स कंपन्यांची बळजबरीची वसुली थांबवा : शिवसेनेची मागणी; सेलू तहसीलदारांना निवेदन
- भाजपच्या परभणी जिल्हा कोअर कमिटीच्या बैठकीतून जिल्ह्यातील संघटनात्मक कामकाजाचा आढावा : प्रदेश सरचिटणीस सुनील राणे यांची प्रमुख उपस्थिती
- वंदे मातरम् राष्ट्रीय शिबिरासाठी अनुराज रासकटला यांची निवड : रायपूर येथे होणार्या शिबिरात करणार महाराष्ट्राचे प्रतिनिधित्व; परभणीच्या शिरपेचात मानाचा
- ब्रह्मकुमारी शिवानी दीदी यांच्या कार्यक्रमाच्या नियोजनासाठी महापौर सय्यद इकबाल यांच्याकडून स्थळाची पाहणी
- महापालिकेकडून श्वान निर्बीजीकरण मोहिम सुरु ; नागरिकांच्या तक्रारींची दखल
- 34 हजार दुय्यम न्यायालयीन कर्मचारी 17 नोव्हेंबरपासून बेमुदत संपावर : ‘समान काम, समान वेतन’ची प्रमुख मागणी


