परभणी,(प्रतिनिधी) : स्व. अॅड. शेषरावजी धोंडजी भरोसे (आबा) यांच्या 17 व्या पुण्यस्मरणानिमित्त रविवार 22 नोव्हेंबर रोजी वसमत रस्त्यावरील संत तुकाराम महाविद्यालयात हभप बाळू महाराज गिरगावकर यांच्या सुश्राव्य कीर्तनाचे आयोजन करण्यात आले आहे.
सकाळी 10 ते दुपारी 1 वाजेपर्यंत कीर्तनाचा कार्यक्रम होणार असून, त्यानंतर दुपारी 1 ते सायंकाळी 5 वाजेपर्यंत भोजनाची व्यवस्था करण्यात आली आहे. स्व. भरोसे (आबा) यांच्या स्मृतींना अभिवादन करण्यासाठी आयोजित या कार्यक्रमाला नागरिकांनी सहकुटुंब उपस्थित राहावे, असे आवाहन आयोजकांच्या वतीने करण्यात आले आहे.
Saturday, November 21
ताज्या बातम्या:
- दामपुरी येथून ५ लाखांची बोलेरो पिकअप चोरीला; अज्ञात चोरट्याविरुद्ध गुन्हा
- विशेष लोकअदालतीत 32 प्रकरणे निकाली : धनादेश अनादर प्रकरणांतून 28 लाख 96 हजार 806 रुपयांची वसुली; 21 नोव्हेंबर रोजी आयोजन
- कौसडीच्या सचिन अरुण गिरी यांना पीएच.डी. पदवी प्रदान गावाच्या शिरपेचात मानाचा तुरा
- राष्ट्रीय नवजात शिशु सप्ताहानिमित्त उपजिल्हा रुग्णालय गंगाखेड येथे जनजागृतीपर कार्यक्रमाचे आयोजन
- परभणीतील वाहतूक कोंडी, अतिक्रमण आणि खड्ड्यांचा प्रश्न ऐरणीवर; जिल्हाधिकाऱ्यांकडे AIYF चे सविस्तर निवेदन!
- संत तुकाराम महाविद्यालयात उद्या हभप बाळू महाराज गिरगावकर यांचे कीर्तन; स्व. अॅड. शेषरावजी भरोसे (आबा) यांच्या 17 व्या पुण्यस्मरणानिमित्त आयोजन
- छत्रपती शिवाजी महाराज पुतळा परिसरात बसच्या चाकाखाली सापडून एकाचा मृत्यू ; दुसरा जखमी
- नांदेड – पूर्णा रस्त्यावरील चुडावा परिसरात दुचाकी व ट्रॅक्टर अपघातात एका युवकाचा मृत्यू


