परभणी,(प्रतिनिधी) : महाराष्ट्र शासनाच्या परशुराम आर्थिक विकास महामंडळाचे अध्यक्ष तथा कॅबिनेट मंत्री दर्जा प्राप्त कॅप्टन आशिष आनंद दामले हे रविवार 29 नोव्हेंबर रोजी परभणी जिल्ह्याच्या दौर्यावर येत आहेत. या दौर्यात ते विविध सामाजिक व संघटनात्मक कार्यक्रमांना उपस्थित राहणार आहेत.
दौर्यानिमित्त कॅप्टन दामले हे छत्रपती संभाजीनगर येथून परभणीकडे प्रयाण करणार असून, सकाळी 10 वाजता त्यांचे परभणी येथील शासकीय विश्रामगृहात आगमन होईल. सकाळी 11 वाजता अखिल भारतीय पेशवा संघटनेच्या वतीने आयोजित 21 व्या ब्राह्मण वधू-वर सूचक मेळाव्याच्या उद्घाटन सोहळ्यास ते उपस्थित राहणार आहेत. हा कार्यक्रम नांदखेडा रोडवरील वैष्णवी मंगल कार्यालयात होणार आहे. त्यानंतर सकाळी 11.30 वाजता ते योगेश सोनपेठकर यांच्या निवासस्थानी सदिच्छा भेट देणार आहेत. दुपारी 12.30 वाजता परभणी येथून बदनापूरकडे प्रयाण करून ते पुढील नियोजित कार्यक्रमांना उपस्थित राहणार आहेत.
Friday, November 27
ताज्या बातम्या:
- स्नेह-शारदानगरातील ज्ञानेश्वरी व विष्णुसहस्रनाम पारायण सोहळ्याची उद्या होणार सांगता; भाविकांना उपस्थित राहण्याचे आवाहन
- परशुराम आर्थिक विकास महामंडळाचे अध्यक्ष कॅप्टन आशिष दामले रविवारी परभणी दौर्यावर : 21 व्या ब्राह्मण वधू-वर सूचक मेळाव्याच्या उद्घाटनास उपस्थिती
- अनैतिक संबंधातून तरुणाची हत्या; महिला व तिच्या दोन मुलांना ताब्यात घेत स्थानिक गुन्हे शाखेचा गुन्ह्याचा उलगडा
- परभणीत राज्यस्तरीय शालेय आर्चरी स्पर्धेचा दिमाखात शुभारंभ; राज्यातील आठ विभागांतील २५० खेळाडूंचा सहभाग
- परभणीची शिक्षणयात्रा दत्तात्रेय वारे गुरुजींच्या भेटीला; पालकमंत्री मेघना साकोरे-बोर्डीकर यांच्या संकल्पनेतुन 200 शिक्षकांची जालिंदरनगर शाळेला भेट
- आदिवासी युवकांच्या स्वप्नांना ड्रोनची भरारी; अमृत-टीआरटीआय करारामुळे आधुनिक तंत्रज्ञानातील करिअरची संधी
- महात्मा फुले मागासवर्ग विकास महामंडळामार्फत लाभार्थ्यांचे सर्वेक्षण व योजनांचे परिणाम मूल्यांकन
- जिल्हा परिषदचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी डॉ.संदिप घोन्शीकर लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या जाळ्यात. अन्य एक कर्मचारी पण ताब्यात


