परभणी,(प्रतिनिधी) : येथील होमिओपॅथिक अकॅडमी ऑफ रिसर्च अॅन्ड चॅरिटीजच्या वतीने राबविण्यात येणार्या ‘आनंदी वाचनपेटी’ उपक्रमांतर्गत भारस्वाडा येथील जिल्हा परिषद शाळेला शनिवार 28 नोव्हेंबर रोजी 101 पुस्तकांची भेट देण्यात आली. या उपक्रमासाठी हेमलता कोरवार यांनी प्रायोजकत्व स्वीकारले.
संस्थेच्या वतीने नुकतीच विजयवाडा ते रामेश्वरम अशी 1 हजार 7.41 किलोमीटरची सायकल मोहीम पूर्ण करण्यात आली. कुटुंबात वाचनसंस्कृती रुजविणे, सामाजिक एकोपा वाढविणे आणि पर्यावरण संवर्धनाचा संदेश देणे हा या मोहिमेचा उद्देश होता. या मोहिमेच्या निमित्ताने भारस्वाडा शाळेला पुस्तकांची भेट देण्यात आली. यावेळी संस्थेचे अध्यक्ष डॉ. पवन चांडक, त्वचारोगतज्ज्ञ डॉ. दिनेश भुतडा, प्रशांत कोरवार, मुख्याध्यापक रवी लोहट, शिक्षक विजय मद्रेवार, श्रीनिवास बोरगावकर, वैशाली मद्रेवार, चंद्रकला बोरगावकर तसेच शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष व उपाध्यक्ष उपस्थित होते.
यावेळी डॉ. पवन चांडक म्हणाले की, समाजातील दातृत्व केवळ आर्थिक मदतीपुरते मर्यादित नसून त्यातून विद्यार्थ्यांचे भविष्य घडविण्याची संधी निर्माण झाली पाहिजे. हेमलता कोरवार यांनी पुस्तकांच्या माध्यमातून केलेले दातृत्व विद्यार्थ्यांसाठी ज्ञानाची शिदोरी ठरणार आहे. समाजातील दानशूर व्यक्तींनी वाढदिवस, स्मृतिदिन किंवा इतर आनंदाच्या प्रसंगी शाळांना पुस्तके भेट देण्याचा संकल्प करावा. अशा छोट्या योगदानातून वाचनसमृद्ध समाजाची निर्मिती होऊ शकते, असे आवाहन त्यांनी केले.
Saturday, November 28
ताज्या बातम्या:
- भारस्वाडा जिल्हा परिषद शाळेला 101 पुस्तकांची भेट : एचएआरसीचा ‘आनंदी वाचनपेटी’ उपक्रम; हेमलता कोरवार यांचे प्रायोजकत्व
- साहित्यिकांनो, साहित्यातून ग्रामजागराचा ‘कल्लोळ’ करा – प्रा. इंद्रजित भालेराव यांचे आवाहन : चाटोरीतील ग्रामजागर साहित्य संमेलनाचे उद्घाटन जल्लोषात
- 17 महसूल मंडळातील शेतकरी पीकविम्याच्या प्रतिक्षेत : पीक विमा कंपनीच्या आक्षेपावर सुनावनी प्रलंबित
- परभणीत २९ नोव्हेंबरला कृषी पदवीधरांसाठी ‘महा मेगा भरती;पालकमंत्री मेघना साकोरे-बोर्डीकर यांच्या मार्गदर्शनाखाली रोजगार मेळावा
- पालम येथे ‘शासकीय सेवा व योजनांचा महामेळावा आणि कायदेविषयक महाशिबिर’ उत्साहात संपन्न; नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद
- लाचखोर डेप्टी सीईओसह कर्मचार्यास व्हीआयपी ट्रिटमेंट : पोलीस कोठडी ऐवजी आरोपींचा आयसीयुमध्ये आराम
- उद्या परभणीत राज्यस्तरीय मॅराथॉन स्पर्धा : जिल्हा अॅथलेटीक्स असोसिएशनद्वारे स्पर्धांचे आयोजन
- उपमुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. संदीप घोन्शीकर यांच्यासह कर्मचार्यास दोन दिवसांची पोलीस कोठडी : लाच स्विकारल्याचे प्रकरण


