परभणी ( प्रतिनिधी) 11 ऑक्टोबर रोजी प्रियदर्शनी इंदिरा गांधी क्रीडा संकुल येथे महाराष्ट्र अथलेटिक्स असोसिएशन व जिल्हा अथलेटिक्स असोसिएशन यांच्या मान्यतेने
डॉ. सिद्धार्थ हत्तीअंबिरे यांच्या आयोजनातून राज्यस्तरीय परभणी महा मॅरेथॉन स्पर्धा संपन्न झाली.
सकाळी सात वाजता स्पर्धेला प्रारंभ झाला यावेळी स्पर्धेचे उद्घाटन प्रसंगी ज्येष्ठविधीज्ञ अशोक सोनी, पोलीस उपाधीक्षक दिनकर डंबाळे, शिवछत्रपती क्रीडा पुरस्कार प्राप्त मंगल पांडे, आयोजक सिद्धार्थ हत्तीअंबिरे यांची उपस्थिती होती.
उपस्थित मान्यवरांच्या हस्ते हिरवी झेंडा दाखवत स्पर्धेचे उद्घाटन करण्यात आले यानंतर स्पर्धेला सुरुवात झाली.
स्पर्धा तीन गटात घेण्यात आली
यात 14 ते 16 वयोगट 3 किलोमीटर ,16 ते 18 वयोगट 6 किलोमीटर तसेच अठरा वर्षाच्या पुढील 10 किलोमीटर घेण्यात आली.
विशेष बाब म्हणजे पहिल्यांदाच परभणी शहरातून विविध भागातून ही स्पर्धा अतिशय उल्लेखनीय पद्धती नियोजन करण्यात आले. स्पर्धेच्या एक दिवसापूर्वीच राज्यभरातून या स्पर्धेला परभणीत नामवंत खेळाडू दाखल झाले.
विविध गटातील असणारे दोन लाख रुपयाचे विविध बक्षिसे स्पर्धेत ठेवण्यात आली होती.
सकाळी सात वाजता सुरू झालेली स्पर्धा साडेआठ पर्यंत संपन्न झाली त्यानंतर बक्षीस वितरणाचा कार्यक्रम घेण्यात येणार बक्षीस वितरणाच्या कार्यक्रमाला सुप्रसिद्ध सेने अभिनेत्री रिंकू राजगुरू यांची विशेष उपस्थिती होती.
यावेळी खासदार संजय जाधव पाथरी विधानसभेचे आमदार सुरेशराव वरपूडकर, परभणी विधानसभेचे आमदार डॉक्टर राहुल पाटील, डॉक्टर सिद्धार्थ भालेराव,
आयोजक डॉ. सिद्धार्थ हत्तीअंबिरे यांच्या सह इतर मान्यवरांच्या उपस्थितीत बक्षीस वितरण संपन्न झाले.
यावेळी प्रास्ताविकेत हत्तीअंबिरे म्हणाले की परभणीचे भूमी ही सांस्कृतिक व क्रीडा नगरी आहे
माझ्या माध्यमातून सर्वसामान्य ग्रामीण भागातील खेळाडूंना संधी मिळावी यासाठी या राज्यस्तरीय मॅरेथॉन स्पर्धेचे नियोजन करण्यात आले यापूर्वी राज्यस्तरीय मॅरेथॉन स्पर्धा संपन्न झाली देशपातळीवरील ग्रीन कार्ड नामांकन त्या स्पर्धेला मिळाले होते भविष्यात राष्ट्रीय स्तरावरील मॅरेथॉन स्पर्धा घेण्याचा माझा मानस आहे आपल्या सर्वांच्या सहकार्याने अशा स्पर्धा यशस्वी होऊ शकतात.
यावेळी उपस्थित मान्यवरांनी हत्तीअंबिरे यांच्या आयोजनाचे कौतुक करत परभणी सारख्या ठिकाणी अशा स्पर्धा आयोजित करून खेळाडूंना संधी उपलब्ध करून देणे हे फार मोलाचे कार्य ते करत आहेत.
यावेळी आयोजक सिद्धार्थ हत्तीअंबिरे यांची दक्षिण कोरिया देशाने आंतरराष्ट्रीय दुत म्हणून नियुक्ती केल्याबद्दल सर्व मान्यवरांच्या हस्ते त्यांचा येथे यथोचित सत्कार करण्यात आला.
यावेळी अभिनेत्री रिंकू राजगुरू यांनी उपस्थित खेळाडू व क्रीडा प्रेमी नागरिकांशी संवाद साधला. तीन किलोमीटर गटामध्ये प्रथम पारितोषिक हिंगोली जामखेड खुर्द येथील धावपटू कार्तिक अंकुश राठोड याने पटकावले, द्वितीय पारितोषिक परभणी पेडगाव येथील धावपटू वैभव तरंगे यांनी पटकावले तसेच तृतीय पारितोषिक परभणी येथील धावपटू शेख साद शेख सलीम यांनी पटकावले.
6 किलोमीटर गटात प्रथम पारितोषिक नाशिकचा धावपटू बिन्नर रोहित शिवाजी याने पटकावले ,द्वितीय क्रमांक वाशिम येथील धावपटू वानखेडे नंदकिशोर शंकर यांनी पटकावले तसेच तृतीय क्रमांक जालना येथील झोरे सचिन बबन याने पटकावले. या गटात अजून सात बक्षीस देण्यात आले.
तसेच दहा किलोमीटर गटात प्रथम क्रमांक नागपूर येथील धावपटू राजन यादव यांनी पटकावले,द्वितीय क्रमांक नाशिक येथील धावपटू ऋषिकेश वावडे यांनी पटकावले तसेच तृतीय क्रमांकाचे पारितोषिक नाशिक येथील धावपटू दयानंद चौधरी यांनी पटकावले तसेच चौथ्या क्रमांकाचे पारितोषिक अकोले येथील धावपटू सुनील गिरी या गटात सहा परितोषिक अजून देण्यात आली.
स्पर्धेचे समन्वय प्रा डॉ माधव शेजुळ प्रा रंजीत काकडे, प्रा डॉ गुरुदास लोकरे यांच्यासह जिल्हा अथलेटिक्स असोसिएशनचे पदाधिकारी ,पंच संयोजक समितीच्या पदाधिकाऱ्यांच्या उत्कृष्ट नियिजना बद्दल यावेळी सर्वाचा सत्कार करण्यात आला.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक आयोजक डॉ सिद्धार्थ हत्तीअंबिरे यांनी केले तर
सूत्रसंचालन राहुल वाहिवळ यांनी केले तर आभार राजेश रणखांब यांनी मानले. स्पर्धा साठी परभणी शहरातील क्रीडा प्रेमिक नागरिकांची मोठ्या प्रमाणात उपस्थिती होती.
स्पर्धा यशस्वी करण्यासाठी राजेश रणखांब ,सुधीर कांबळे ,चंद्रशेखर साळवे, उत्तम गायकवाड ,अमोल धाडवें,मकरंद बाणेगावकर ,विजय सुतारे, अंबादास तुपसमुंद्रे,अजय रसाळ, बुद्धभूषण हत्तीअंबिरे यांच्यासह समितीच्या सर्व पदाधिकारींनी परिश्रम घेतले