परभणी,(प्रतिनिधी) :शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे सायंकाळी जागा वाटप निश्चित झाल्या त्यानंतर राज्यातील काही विधानसभा मतदारसंघातील उमेदवारांची यादी जाहीर केली यात परभणी विधानसभा मतदारसंघातून शिवसेनेचे ठाकरे गटाचे विद्यमान आमदार डॉ. राहुल पाटील यांची व गंगाखेड विधानसभा मतदारसंघातून शिवसेनेचे जिल्हाप्रमुख विशाल कदम यांची पक्षश्रेष्ठींनी बुधवारी (दि.23) जाहीर केली.
महाविकास आघाडीतून परभणीची जागा शिवसेनेच्या ठाकरे गटाच्या हिश्श्यास जाणार हे स्पष्ट होते. परंतु, गंगाखेडातून महाविकास आघाडीतून शिवसेनेस की अन्य कोण्या मित्र पक्षास जागा बहाल होईल, या बाबत संभ्रम निर्माण झाला होता. परंतु, महाविकास आघाडीने परभणी व गंगाखेड हे दोन्ही विधानसभा मतदारसंघ शिवसेनेच्या ठाकरे गटाच्या पदरात टाकले. त्यामुळे पक्षश्रेष्ठींनी बुधवारी सायंकाळी जागा वाटप निश्चित झाल्या पाठोपाठ राज्यातील काही विधानसभा मतदारसंघातील उमेदवारांची यादी जाहीर केली. त्यात परभणीतून विद्यमान आमदार डॉ. पाटील तर गंगाखेडातून जिल्हाप्रमुख विशाल कदम यांची उमेदवारी जाहीर केेली आहे. त्यामुळे शिवसेनेच्या ठाकरे गटाच्या पदाधिकार्यांसह कार्यकर्त्यांत उत्साहाचे वातावरण पसरले आहे. या दोघा इच्छुकांनी या मतदारसंघात या पूर्वीपासूनच मोर्चेबांधणी सुरु केली होती.