परभणी ( प्रतिनिधी) ९६ परभणी विधानसभा निवडणुक अंतर्गत येणाऱ्या वेगवेगळ्या कक्षास निवडणुक खर्च निरीक्षक श्री राहूल मिश्रा (आय.आर.एस.) यांनी भेट दिली.
निवडणूक कामकाज कक्षास भेट देऊन संपूर्ण कामकाजाचा त्यांनी घेतला आढावा सर्व कक्षातील निवडणूक कामे नियुक्त करण्यात आलेले कर्मचारी यांनी त्यांना माहिती देन्यात आली व सर्व कक्षास भेटी दिल्यानंतर कामकाज पाहून समाधान व्यक्त केले.
त्यांच्या समवेत अप्पर जिल्हाधिकारी श्री. डॉ. प्रताप काळे, श्री. जनार्धन विधाते, निवडणुक निर्णय अधिकारी दत्तू शेवाळे, सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी श्री. संदीप राजपुरे, ना . त. गणेश चव्हाण, ना. त. अनिता वडवळकर,
सी व्हीजिल कक्षाचे नोडल अधिकारी श्री. राकेश गर्जे आदी उपस्थित होते..
सी-व्हिजिल ॲपवर एक तक्रार
आचारसंहितेचे उल्लंघन होत असल्याबाबत ९६ परभणी विधानसभा मतदारसंघात २३ ऑक्टोबर पर्यंत सी- व्हिजिल ॲपवर एक तक्रार प्राप्त झाली आहे. या तक्रारींचे निराकारण करण्यात आले आहे.
विधानसभेची निवडणूक जाहीर झाली असून, आदर्श आचारसंहितेचे काटेकोर पालन व्हावे, या उद्देशाने निवडणूक आयोगाने विविध उपाययोजना केल्या आहेत. सर्वसामान्य नागरिकांना देखील आचारसंहितेच्या अनुषंगाने काही तक्रारी असतील तर त्या करता याव्यात, या उद्देशाने सुविधा उपलब्ध करून दिल्या आहेत. त्यामध्ये सर्वसामान्य नागरिकांसाठी सीव्हिजिल हे ॲपवर कार्यान्वित केले आहे. या ॲपवर नागरिकांना तक्रारी दाखल करता येतील. तक्रार करताना ॲपवर आचारसंहिता भंग होत असल्याचा फोटोही अपलोड करावायाचा आहे.
१०० मिनिटांत निरसन
सी-व्हिजिल ॲपवर प्राप्त झालेल्या तक्रारींचे १०० मिनिटात निराकारण करणे बंधनकारक आहे. त्यानुसार प्राप्त तक्रारींचे निराकारण करण्यात आले.
होर्डिंग्ज, बॅनरच्या अनुषंगाने सदरील तक्रार होती. तक्रार चे निराकारण केले आहे, अशी माहिती सीव्हीजील कक्षाचे नोडल अधिकारी इंजि. राकेश गर्जे यांनी दिली.
((छाया: उत्तम बोरसुरीकर)