शिवसेना उबाठा गटाचे परभणी विधानसभेचे उमेदवार आ.राहुल पाटील यांच्या धर्मापुरी येथून प्रचाराचा शुभारंभ
परभणी (प्रतिनिधी) आ. राहुल पाटील हे उध्दव ठाकरे यांचे निष्ठावान शिवसैनिक आहेत. त्यांचे आजपर्यंतचे काम आणि विकासाची दृष्टी पाहता मतदारही त्यांच्या पाठीमागे भक्कमपणे उभे असल्याने त्यांचा विजय निश्चित असून या निवडणुकीत महाविकास आघाडीचे हात बळकट करण्यासाठी उद्धव सेनेच्या सर्व उमेदवारांच्या पाठीमागे एक दिलाने उभे राहावे असे आवाहन आ.सुरेश वरपुडकर यांनी केले.महाविकास आघाडी तथा शिवसेना उबाठा गटाचे परभणी विधानसभेचे उमेदवार आ.डॉ.राहुल पाटील यांच्या प्रचाराचा शुभारंभ तालुयातील धर्मापुरीत मंगळवारी झाला. त्याप्रसंगी ते बोलत होते.
याप्रसंगी खा. संजय जाधव, आ.सुरेश वरपुडकर, माजी खा.तुकाराम रेंगे, माजी उपमहापौर भगवानराव वाघमारे, काँग्रेसचे बाळासाहेब देशमुख, किरण सोनटक्के, डॉ.विवेक नावंदर, जाकेर लाला, विकास लंगोटे, पंढरीना घूले, जवंजाळ दाजी, रविराज देशमूख, सुशिल देशमूख, दिपक देशमूख, पंजाब देशमूख, बंडू पाचलिंग, दिलीप देशमूख यांच्यासह पदाधिकारी, महाविकास आघाडीचे नेते, कार्यकर्ते उपस्थित होते.
यावेळी बोलताना खा. संजय जाधव म्हणाले, आ.डॉ.पाटील यांचे दहा वर्षातील विकास काम पाहता मतदारांच्या मनामध्ये त्यांनी स्थान निर्माण केले आहे. महाविकास आघाडी पदाधिकारी, नेते, कार्यकर्ते यांनी अधिकाधिक संख्येने मतदान करून घेण्यासाठी आता प्रयत्न करावेत. एक लाखाचे मताधिय लक्ष गाठण्यासाठी प्रत्येकाने दक्ष रहावे. परभणीसह गंगाखेड, जिंतूर आणि पाथरी येथील महाविकास आघाडीच्या उमेदवारांना विजयी करण्यासाठी आपण सर्वांनी मतदारांना आवाहन करावे, असे ते म्हणाले.
आ.राहुल पाटील म्हणाले, विरोधक कोणतेही मुद्दे नसल्याने गोंधळ घालतील किंवा तणाव निर्माण करतील. त्याला कोणीही बळी पडू नये. सर्वसामान्यांना न्याय देण्याचे काम, विकासाचे काम महाविकास आघाडी तथा मतदारसंघात माझ्याकडून झाले आहे. सर्वांनी खांद्याला खांदा लावून काम करावे. हे सरकार सर्वसामान्यांच्या मनातून कधीच गेले आहे. आता फक्त त्याला धक्का मारायचा आहे. यानंतर पुन्हा हे सरकार पंचवीस वर्ष परत येणार नाही. मताधियाचे उद्दिष्ट गाठण्यासाठी सर्वांनी शर्तीचे प्रयत्न करावेत.
याप्रसंगी माजी खा.तुकाराम रेंगे, बाळासाहेब देशमुख, किरण सोनटक्के, विकास लंगोटे यांच्यासह अनेकांनी मनोगत व्यक्त केले.


