परभणी,(प्रतिनिधी) : दिवाळी सण आनंदाचा, उत्साहात चा, प्रकाशाचा. सर्वत्र दिवाळी चा सण साजरा होत असताना, गोरगरिबांच्या दिवाळी पण आनंदात जावी या साठी ‘चलो जलाए दीप वहां जहां अभी अंधेरा हैं’ या उक्तिप्रमाणे येथील स्वामी विवेकानंद मित्र मंडळाच्यावतीने दिवाळी सणाचे औचित्य साधून गरीब व गरजू कुटूंबांना शिधा वाटप करण्यात आला.
जिंतूर रस्त्यावरील नूतन महाविद्यालयाच्या मैदानावर हे सर्व कुटूंब पाल ठोकून राहतात. या कुटूंबांची दिवाळी गोड व्हावी या उद्देशाने स्वामी विवेकानंद मित्रमंडळाच्यावतीने शिधा वाटप करुन दिवाळी साजरी करण्यात आली. यावेळी मित्र मंडळाचे अध्यक्ष संजय कुलकर्णी, गणेश निर्वळ पाटील, मिलिंद भोगवकर, वैभव मदनराव होगे, शंकर रोड़े ,गोपाल शर्मा, संतोष वहवाल, अविनाश चक्रवार, प्रवीण घोंघड़े, संचय दोषी, मकरंद मंडे, सावंगीकर, उमेश विश्रूप, प्रमोद कुलकर्णी आदींची उपस्थिती होती.
Friday, August 21
ताज्या बातम्या:
- केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले उद्या परभणी दौऱ्यावर
- उत्कृष्ट सार्वजनिक ग्रंथालय व ग्रंथमित्र पुरस्कारासाठी २५ सप्टेंबरपर्यंत प्रस्ताव सादर करण्याचे आवाहन
- जातीय मानसिकतेविरोधात भीमशक्ती आक्रमक; परभणीत मुंडन, पिंडदान व सत्यशोधक यज्ञ
- परभणीत प्रथमच आर.पी.हॉस्पीटल येथील सूक्ष्मजीवशास्त्र प्रयोगशाळेला NABL मानांकन
- भटकंती ची मजा, भारत भ्रमणा चा एक वेगळाच आनंद, मनाला भिडणारा भारत प्रवास – ओमप्रकाश शर्मा
- जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. संजय पांचाळ व जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. नागेश लखमावार निलंबित :उपचारातील हलगर्जीपणाचा ठपका कर्तव्यात कसूर
- परभणीत आयटक या केंद्रीय कामगार संघटनेच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालयासमोर कामगारांचे प्रचंड धरणे आंदोलन
- प्रसिद्ध भूलतज्ञ डॉक्टर मधुसूदन मगर यांचे निधन ; आज सायंकाळी पाच वाजता अंत्यसंस्कार


