परभणी,(प्रतिनिधी) : महाराष्ट्र विधानसभा सार्वत्रिक निवडणूक 2024 निमित्त जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी परभणी व नोडल अधिकारी प्रा. गणेश शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली मतदार जनजागृती व्हावी व मतदानाचा टक्का वाढावा या उद्देशाने जिल्हास्तरीय वक्तृत्व स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे.
या स्पर्धा ऑनलाइन होणार असून शालेय गट इयत्ता 8 ते 10वी व महाविद्यालयीन गट इयत्ता 12 ते पदवी स्तर या गटात होणार असून विजेत्यांना परितोषिके देणार आहेत. तर सहभागी स्पर्धकांना प्रमाणपत्र वाटप करण्यात येणार आहेत. वक्तृत्व स्पर्धेत शालेय गटासाठी ‘मतदाराचे अधिकार आणि कर्तव्ये’, ‘मतदार राजा जागा हो…’, ‘आई बाबा! तुम्ही मतदान कराच..’ हे तीन विषय असणार आहेत. तर महाविद्यालयीन गटासाठी ‘जागृत नागरिक लोकशाहीचा आधार’, ‘उत्सव निवडणुकीचा ; अभिमान देशाचा’, ‘ होय! मी मतदान करणारच, कारण…’ हे तीन विषय ठेवण्यात आले आहेत.
प्रथम, द्वितीय, तृतीय आणि उत्तेजनार्थ विजेत्या स्पर्धकांना पारितोषिक व प्रमाणपत्र देण्यात येईल. तसेच सहभागी स्पर्धकांना प्रमाणपत्र देण्यात येईल. परीक्षकांचा निर्णय अंतिम राहील. ही स्पर्धा मराठी भाषेतून होणार असून स्पर्धकांनी वक्तृत्व स्पर्धेचा व्हिडिओ तीन ते चार मिनिटांचा तयार करून तो 9405210267 या व्हॉटसअप क्रमांकावर 15 नोव्हेंबर पर्यंत पाठवावा, असे आवाहन जिल्हाधिकारी रघुनाथ गावडे, उपजिल्हा निवडणूक अधिकारी जनार्धन विधाते, स्वीप नोडल अधिकारी गणेश शिंदे यांनी केले आहे.
Friday, August 21
ताज्या बातम्या:
- केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले उद्या परभणी दौऱ्यावर
- उत्कृष्ट सार्वजनिक ग्रंथालय व ग्रंथमित्र पुरस्कारासाठी २५ सप्टेंबरपर्यंत प्रस्ताव सादर करण्याचे आवाहन
- जातीय मानसिकतेविरोधात भीमशक्ती आक्रमक; परभणीत मुंडन, पिंडदान व सत्यशोधक यज्ञ
- परभणीत प्रथमच आर.पी.हॉस्पीटल येथील सूक्ष्मजीवशास्त्र प्रयोगशाळेला NABL मानांकन
- भटकंती ची मजा, भारत भ्रमणा चा एक वेगळाच आनंद, मनाला भिडणारा भारत प्रवास – ओमप्रकाश शर्मा
- जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. संजय पांचाळ व जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. नागेश लखमावार निलंबित :उपचारातील हलगर्जीपणाचा ठपका कर्तव्यात कसूर
- परभणीत आयटक या केंद्रीय कामगार संघटनेच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालयासमोर कामगारांचे प्रचंड धरणे आंदोलन
- प्रसिद्ध भूलतज्ञ डॉक्टर मधुसूदन मगर यांचे निधन ; आज सायंकाळी पाच वाजता अंत्यसंस्कार


