परभणी,(प्रतिनिधी) : परभणी म्हणजे माझे होम पिच आहे, इथं येणं एक मजा आहे. तुम्ही आहातच तसे, असे नमूद करतेवेळी गद्दारी झाली परंतु, आ. पाटील असो, खा. जाधव व परभणी जिल्हावासीयांनी गद्दारीचा तो किडा गडाला लागू दिला नाही. लोकसभेतून प्रचंड मताधिक्याने विजय दिला आता विधानसभा निवडणूकीतसुध्दा तेवढ्याच मताधिक्याने चारही उमेदवार निवडणून द्या, असे आवाहन शिवसेनेचे (उबाठा) पक्ष प्रमुख तथा माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी जाहीर केले.
परभणी विधानसभा मतदार संघाचे शिवसेना (उबाठा) तसेच महाविकास आघाडीचे उमेदवार डॉ राहुल पाटील यांच्या प्रचारार्थ शहरातील जिंतूर रोड वरील महात्मा फुले विद्यालयाच्या मैदानावर शनिवारी (दि.09) रात्री आयोजित केलेल्या जाहीर सभेप्रसंगी पक्षप्रमुख ठाकरे बोलत होते. यावेळी खा. संजय जाधव, खा.प्रा श्रीमती फौजिया खान, आ. सुरेश वरपुडकर, माजी आ. सुरेशदादा देशमुख, माजी आ.अॅड. विजय गव्हाणे, माजी आ. सौ. मिरा रेंगे, माजी आ. डॉ. मधुसुदन केंद्रे, राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे प्रदेश उपाध्यक्ष भिमराव हत्तीअंबीरे, शिवसेनेचे जिल्हाध्यक्ष तथा गंगाखेड विधानसभा चे उमेदवार विशाल कदम, शिवसेनेचे सहसंपर्कप्रमुख डॉ. विवेक नावंदर, शेतकरी कामगार पक्षाचे जिल्हाध्यक्ष किर्तीकुमार बुरांडे, अजय गव्हाणे, काँग्रेसचे महानगर जिल्हाध्यक्ष नदीम इनामदार यांच्यासह अन्य नेते व पदाधिकारी व्यासपीठावर विराजमान होते.
पुढे बोलताना उद्धव ठाकरे म्हणाले की, पंतप्रधान नरेंद्र मोदी, गृहमंत्री अमित शाह हे दोघे सीमेवर चीनने पुन्हा घुसखोरीचे प्रयत्न चालविले असतांना, मणिपूर सारख्या संवेदनशील राज्यात दिवसा ढवळ्या पुन्हा एकदा एका महिलेवर सामुदायिकपणे अन्याय, अत्याचाराची घटना घडली असतांना महाराष्ट्राच्या विधानसभा निवडणूकीत दौरे करीत कमालीचे स्वारस्य दाखवू लागले आहेत. त्यातूनच या दोघांचा असंवेदनशीलपणा, निष्क्रियताच प्रकर्षाने दिसून येत आहे. त्याचे कारणच मोदी असो, शाह यांना कोणत्याही स्थितीत मनमानी कारभार करण्याकरीता मुंबई असो, महाराष्ट्र हवा आहे. महाराष्ट्र म्हणजे नोटा छापण्याचे यंत्र, असा गृह या दोघांचा आहे. गुजरातला सगळं काही नेवू, असाच व्ह्यूव या दोघांसह भाजपाचा राहिला आहे. त्यामुळेच सर्वसामान्य मतदारांनी दूरदृष्टीतील वाटचाल ओळखून या दोघांसह भाजपास महाराष्ट्राबाहेर हद्दपार केले पाहिजे, असे आवाहन ठाकरे यांनी केले.
सर्वसामान्य शेतकर्यांना पुन्हा एकदा आम्ही कर्जमुक्त करु, लाडक्या बहिणीप्रमाणे लाडक्या भावाससुध्दा रोजगार मिळेपर्यंत 4 हजार रुपये प्रतिमहा देवू, पाच जीवनावश्यक वस्तूंचे भाव निश्चितपणे स्थिर ठेवू, असे आश्वासन दिले. लाडकी बहिण योजना असो की कर्जमुक्तीचा निर्णय म्हणजे काय उपकार नाहीत, ते कर्तव्य आहे, असा टोला लगावून ठाकरे यांनी गेल्या दहा वर्षात भाजप नेतृत्वाखालील सरकारच्या कारकिर्दीतील काळे उद्योग निर्लज्जपणाचा कळस आहे, असे नमूद केले. पूल कोसळणं, छत गळणं, संसद असो राममंदिरसुध्दा गळणं, महाराष्ट्राचे आराध्यदैवत असणार्या छत्रपती शिवाजी महाराज यांचा पुतळा कोसळणं म्हणजे निव्वळ महाराष्ट्राच्या थट्टेचा हा प्रकार आहे, असे ठाकरे यांनी म्हटले.
आज मुंबई अदानींच्या घशात टाकली जात आहे. अदानींना मोठ्या प्रमाणावर सोयी, सवलती सुविधा दिल्या जात आहेत. आघाडी सरकार सत्तेवर आल्याबरोबर निश्चितपणे अदानींना मुंबईबाहेर काढू, सुविधा-सवलती काढून घेवू, मराठी माणसालाच हक्काचे, सवलतीत घर उपलब्ध करुन देऊ, अशी ग्वाही ठाकरे यांनी आपल्या भाषणातून दिली.
मी तुमच्यासाठी लढतो, मी महाराष्ट्रासाठी लढतोय, महाराष्ट्र तुटू देणार नाही, कोणासमोर झुकणारसुध्दा नाही, केवळ तुमच्या बळावरच आपण लढतो आहोत, असे नमूद करतेवेळी
परभणी म्हणजे माझे होम पिच आहे, इथं येणं एक मजा आहे. तुम्ही आहातच तसे, असे नमूद करतेवेळी गद्दारी झाली परंतु, आमदार पाटील असो, खा. जाधव व परभणी जिल्हावासीयांनी गद्दारीचा तो किडा गडाला लागू दिला नाही. लोकसभेतून प्रचंड मताधिक्याने विजय दिला आता विधानसभा निवडणूकीतसुध्दा तेवढ्याच मताधिक्याने चारही उमेदवार निवडणून द्या, असे आवाहन करतेवेळी या निवडणूका महत्वपूर्ण आहेत. आता जर यश आले नाही तर महाराष्ट्र हातातून गेलाच समजा, असे ते म्हणाले. (छाया- उत्तम बोरसुरीकर)



