परभणी (प्रतिनिधी) परभणी जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय परभणी तर्फे घेण्यात आलेल्या छत्रपती संभाजी नगर विभागीय बॉक्सिंग स्पर्धेत परभणी येथील बाल विद्या मंदिर हायस्कूल परभणीची कु. अवनी ओमप्रकाश काळे हीने १७ वर्षे वयोगट मुलीच्या बॉक्सिंग स्पर्धेत वजन गट ५७ते ६० यामध्ये प्रथम क्रमांक पटकावलाआहे. आणि तिची राज्यस्तरीय स्पर्धेसाठी निवड झाली आहे.
या यशाबद्दल कु.अवनी तिचे पालक तसेच मार्गदर्शक क्रीडा शिक्षकांचे संस्थेचे अध्यक्ष डॉ. एन.ए. झरकर, सचिव डॉ.विवेक नावंदर, मुख्याध्यापक अरुण बोराडे उप मुख्याध्यापक आर. जी.तुम्मेवार पर्यवेक्षक पी. व्ही. रूघे, बी.के कोपरटकर सौ. एस.एम.बोके सर्व शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी यांनी अभिनंदन केलेआहे. व राज्यस्तरीय स्पर्धेसाठी शुभेच्छा दिल्या आहेत.


