सेलू,(प्रतिनिधी) सेलू तालुका क्रीडा संकुलास जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय कडून सापत्न वागणूक मिळत असल्याचा प्रकार पुढे आला आहे,सेलू तालुका क्रीडा कार्यालय व तालुक्यातील क्रीडा प्रेमी यांनी मागणी करूनही अजूनही साहित्याचा पुरवठा झाला नसून हे साहित्य परभणीतील एका वस्तीगृहात पडून असल्याची बाब समोर आली आहे. त्यामुळे खेळाडू, क्रीडाप्रेमी वर्गातून नाराजी व्यक्त होत आहे.
सेलू येथे तालुका क्रीडा कार्यालय असून तालुका क्रीडा संकुल तसेच खोल्या देखील बांधलेले आहेत परंतु या क्रीडा संकुलात कुठल्याही प्रकारचे साहित्य नाही त्यामुळे क्रीडा प्रेमींची निराशा होत आहे. सेलू तालुक्यामध्ये 95 गावे असून या तालुक्याच्या तालुकास्तरीय स्पर्धा होण्यासाठी शासनाने एक वर्ष पूर्वी दिलेल्या साहित्याची मागणी वारंवार क्रीडा कार्यालयाकडे करत करून देखील काही प्रतिसाद मिळत नाही.

तालुक्यातील खेळाडूंना विविध स्पर्धेच्या तयारीसाठी क्रीडा संकुलात घ्यावे लागते परंतु साहित्य नसल्याने तयारी करणार कशी असा प्रश्न आहे त्यामुळे तालुका क्रीडा अधिकारी कार्यालय तसेच तालुक्यातील क्रीडा शिक्षकांनी वेळोवेळी जिल्हाधिकारी कार्यालय जिल्हाधिकारी कार्यालय यांच्याकडे साहित्याची मागणी केली होती परंतु अजूनही मागणी पूर्ण झाली नाही बदलत क्रीडा स्पर्धा पार पडल्या परंतु साहित्य उपलब्ध झाले नाही साहित्य विनाच स्पर्धा स्पर्धेत भाग घ्यावा लागला दरम्यान सेलू तालुक्याला मंजूर झालेले क्रीडा साहित्य हे परभणी शहरातील एका वस्तीगृहात पडून असल्याची बाब पुढे आली आहे, त्यामुळे क्रीडा प्रेमी संताप व्यक्त करत आहेत तात्काळ सेलूच्या हक्काचे क्रीडा साहित्य द्यावे अशी मागणी क्रीडाप्रेमी वर्गातून होत आहे



