परभणी, (प्रतिनिधी) नेहरु युवा केंद्र कार्यालयाच्या वतीने दरवर्षीप्रमाणे 12 ते 15 जानेवारी 2025 दरम्यान दिल्ली येथे राष्ट्रीय युवा महोत्सवाचे आयोजन करण्यात आले असून, दि. 5 डिसेंबर 2024 पर्यंत नावनोंदणी करण्याचे आवाहन जिल्हा युवा अधिकारी यांनी केले आहे.
एक लाख युवा नेत्यांचे राजकीय क्षेत्रात पदार्पण व्हावे, त्यांना कोणतीही राजकीय पार्श्वभूमी असू नये, असे युवा नेते या कार्यक्रमाच्या माध्यमातून जोडण्याचे प्रधानमंत्र्यांचे व्हीजन आहे. या युवा महोत्सवाच्या कार्यक्रमात निवड झालेल्या नेत्याला 11 आणि 12 जानेवारी 2025 रोजी प्रधानमंत्र्यांसमोर आपले विचार, कल्पना आणि मत मांडू शकणार आहेत. युवा नेता निवडीसाठी 15 ते 19 वर्षे वयाची मर्यादा असून, त्याने एमवाय डॉट जीओव्ही डॉट इनवर ऑनलाईन नोंदणी करावी. तसेच तो विकसीत भारताविषयी प्रश्नावली, निबंध/ब्लॉग लेखन, विकसीत भारत व्हीजन पिच डेक आणि विकसीत भारत राष्ट्रीय स्पर्धा या चार टप्प्यांची स्पर्धा उत्तीर्ण होणे आवश्यक आहे. या स्पर्धेत सहभागी नोंदणी केलेल्या युवांनी पहिल्या प्रश्न फेरीसाठी वरील लिंकवर 25 नोव्हेंबर ते 5 डिसेंबर 2025 रोजी प्रश्नावली सोडवावी. त्यानंतर निवड झालेले सहभागी पुढील फेरींसाठी पात्र ठरतील,असेही जिल्हा युवा अधिकारी यांनी कळविले आहे.
*-*-*-*-*

