परभणी( प्रतिनिधी)परभणी जिल्हा टेनिस व्हॉलीबॉल असोसिएशन वतीने दि. २५ नोव्हेंबर नृसिंह माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय पोखर्णी येथे टेनिस व्हॉलीबॉल खेळांचा प्रसार प्रचार करण्यासाठी राज्य सचिव गणेश माळवे यांनी कार्यशाळेत शालेय 60 मुले मुलीना टेनिस व्हॉलीबॉल खेळांची माहिती देऊन प्रात्यक्षिके व माहिती दिली.
याप्रसंगी माळवे म्हणाले भारतीय टेनिस व्हॉलीबॉल खेळ हा पुणे येथे डॉ व्यंकटेश वांगवाड सरांनी सुरू केला, या खेळांच्या 25 राज्य, राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेत संपन्न होऊन महाराष्ट्र राज्य संघाने सुवर्णपदक प्राप्त करत आहे.
हा खेळ कमी खर्चिक, कमी साहित्य, जागेत खेळण्यात येतो यामुळे संपूर्ण देशात लोकप्रिय झाला आहे. या खेळातून भरपूर व्यायाम मिळून आरोग्यदायी खेळ आहे. हा खेळ शालेय क्रीडा स्पर्धेत खेळाला जातो, क्रीडा केंद्रिय मंञालय दिल्ली यांची मान्यता मिळाली आहे.
टेनिस व्हॉलीबॉल प्रात्यक्षिके आंतरराष्ट्रीय खेळाडू सिध्दांत लिपने यांनी खेळाडूंना खेळवून दाखवली. नाविन्यपूर्ण खेळातून खेळाडू आनंद व्यक्त केला.
याप्रसंगी प्राचार्य पी.बी. शेळके , प्रा. नागेश कान्हेकर, मा.नगरसेवक मनिष कदम, जेष्ठ शिक्षक एन. एन.पवार, क्रीडा शिक्षक माणिक कदम, प्रा. संजय गजमल, गणेश धोपटे, सुनील गवई, उपस्थित होते
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा. ञ्यंबक वडसरकर, तर आभारप्रदर्शन पवार यांनी मानले.
Thursday, May 21
ताज्या बातम्या:
- परभणी जिल्हा पुन्हा भगवामय करणार – आमदार डॉ राहुल पाटील यांचा निर्धार : शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाच्या नूतन पदाधिकाऱ्यांचा सत्कार
- चाळीशीत वाढताहेत ‘हार्ट अटॅक’चे प्रमाण; आर.पी. हॉस्पिटलचा ‘TMT’ उपक्रम अवघ्या ३०० रुपयांत
- नानलपेठ पोलीस ठाण्यात २४ बेवारस दुचाकी वाहनांचा २८ मे रोजी जाहीर लिलाव
- पत्रकार विजयकुमार मुंदडा यांचे अपघाती मृत्यु प्रकरणाचा जलद गतीने तपास करा; वसमत रोडवरील अपघात रोखण्यासाठी उपाययोजना करण्याची पत्रकारांची मागणी
- राष्ट्रीय स्पर्धेसाठी डॉ. पंकज खेडकर यांची परीक्षक म्हणुन निवड* ; पुण्यात रंगणार ‘भारत उत्सव २०२६’चा सोहळा; लोककला आणि अभिनयाचा अविष्कार
- ज्येष्ठ पत्रकार विजयकुमार मुंदडा यांचे अपघाती निधन ; गंगाखेड येथे अंत्यसंस्कार
- निर्वाचित पक्ष, गट व अपक्षांसाठी महत्त्वाची सूचना: ११ मेपूर्वी आघाडी नोंदणी आवश्यक
- परभणीत 7 मे रोजी गुरव समाजातर्फे वधू-वर परिचय मेळावा व मौंजी संस्कार कार्यक्रम


