परभणी (प्रतिनिधी) मंगळवार दि. १० रोजी दुपारच्या सुमारास येथील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यासमोरील भारतीय संविधानाच्या प्रतिकृतीची विटंबना करण्यात आले. त्याच्या दुसऱ्या दिवशी बुधवारी परभणी बंदची हाक देण्यात आली. या दरम्यान आंदोलन करणारे एका गटाने शहरांमध्ये दगडफेक व जाळपोळी केली. यादरम्यान परभणीचे खा. संजय जाधव आणि खा. फौजिया खान यांनी आपली प्रतिकिया देताना वादग्रस्त वक्तव्य केले असल्याचा आरोप करीत त्यांच्या वक्त्याचे चौकशी करून त्यांच्यावर कारवाई करण्यात यावी अशी मागणी भारतीय जनता पार्टीचे आ. सौ मेघना बोर्डीकर साकोरे यांनी गुरुवारी आयोजित पत्रकार परिषदेत केली.
येथील अतिथी हॉटेल येथे आयोजित पत्रकार परिषदेत त्या बोलत होत्या.
डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्या शेजारी असलेल्या संविधानाच्या प्रतिकृतीची विटंबना या घटनेचा भारतीय जनता पार्टी निषेध करते या घटनेनंतर दुसऱ्या दिवशी परभणी बंदची हाक देण्यात आली.यावेळी सर्व व्यापाऱ्यांनी स्वतःहून आपले प्रतिष्ठान बंद करून बंद शांततेत पार पडावा यासाठी आंबेडकर जनतेच्या सोबत सहकार्य केले. मात्र सकाळपासून शांततेत सुरू असलेले आंदोलन दुपारी अचानकच पेटले. एका गटांनी दगडफेक करीत दुकानांचे तसेच वाहनांचे मोठे नुकसान केले यावेळेस काही वाहनांना आग लावण्यात आल्या तर दुकानावर ठेवलेल्या साहित्य जाळण्यात आले. मात्र हा जमा अचानक आला कुठून कोणाच्या सांगण्यावरून या जमावाने असे कृत्य केले का? याची चौकशी करण्यात यावी. हिंसक झालेल्या जमावाला शांत करण्याच्या ऐवजी जिल्ह्यातील दोन्ही खासदारांनी दिल्लीत बसून जातीय तेढ निर्माण करणारे वक्तव्य केल्याचे समोर आले. कदाचित त्यांच्या या वक्तव्यामुळेच काही मंडळी जाणीवपूर्वक हा प्रकार घडविला नाही ना अशी शंका आ.मेघना बोर्डीकर यांनी यावेळी व्यक्त केली त्यामुळे या प्रकरणाची सखोल चौकशी करावी व संविधानाचे प्रत्येकाचे अवमान करणाऱ्या मास्टरमाइंड चा शोध घेऊन त्यावर कठोर कारवाई करण्याची मागणी यावेळेस आ. बोर्डीकर यांनी केली.
यावेळेस डॉ. केदार कटिंग भाजप महानगराध्यक्ष राजेश देशमुख सुरेश भुमरे मंगला मुदगलकर आनंद बनसोडे बाळासाहेब भालेराव आदींची उपस्थिती होती


