परभणी (प्रतिनिधी) सोयाबीन विकुन महिना उलटला तरी आमचे पैसे आणखीन मिळाले नाही. तेव्हा स्वाभिमानीचे कार्यकर्ते गेले तेव्हा जिल्हा पणन अधिकारीतिथे उपस्थित नव्हते. आणि जे कर्मचारी उपस्थित होते ते उडवा उडवी चे उत्तर देत होते म्हणून स्वाभिमानीच्या कार्यकर्त्यांनी पणन अधिकाऱ्यांची खुर्ची जप्त करत ती स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या जिल्हा कार्यालयात आणुन ठेवली.

सोयाबीनला बाजारात भाव मिळत नसल्याने राज्य सरकारने पणन च्या मार्फत खरेदी सुरू केली. शेतकरी सोयाबीन घेऊन सरकारी काट्यावर गेल्यास कर्मचारी कपाळावर आठ्या घड्या पाडत मालाला नाव ठेवत कटी कपात करत शेतकऱ्याचा माल कसाबसा खरेदी करत आहेत. त्यात माल देऊनही एक महिना झाला तरी शेतकऱ्यांच्या खात्यावर पैसे पडत नाहीत. एकी कडे बाजारात लूट होत आहे म्हणुन शेतकरी सरकारच्या खरेदी केंद्राकडे वळत आहे परंतु तिथे हि शेतकऱ्यांना छळल जात आहे. सोयाबीन कापणी काढणीचे पैसे शेतकऱ्यांना सोयाबीन विकुनच द्यावे लागतात. पण विकलेल्या सोयाबीनला एक एक महिना पैसे मिळत नाहीत म्हणुन अनेक शेतकरी सरकारी काट्यावर सोयाबीन देण्या ऐवजी कमी भावात व्यापाऱ्याला देतात.
या मुळे उत्पादन खर्च सुद्धा शेतकऱ्यांचा भरून निघत नाही…
आज स्वाभिमानी शेतकरी संघटने कडे काही शेतकऱ्यांनी तक्रार केली की आमचे सोयाबीन विकुन महिना उलटला तरी आमचे पैसे आणखीन मिळाले नाही. तेव्हा स्वाभिमानीचे कार्यकर्ते गेले तेव्हा जिल्हा पणन अधिकारीतिथे उपस्थित नव्हते. आणि जे कर्मचारी उपस्थित होते ते उडवा उडवी चे उत्तर देत होते म्हणून स्वाभिमानीच्या कार्यकर्त्यांनी पणन अधिकाऱ्यांची खुर्ची जप्त करत ती स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या जिल्हा कार्यालयात आणुन ठेवली. जेव्हा शेतकऱ्यांचे पैसे मिळतील तेव्हा ही खुडचि परत करू असा पवित्रा त्यांनी घेतला आहे.
यावेळी किशोर ढगे, मुंजाभाऊ लोडे, माऊली शिंदे, उध्दव जवंजाळ आदी उपस्थित होते.


