परभणी,(प्रतिनिधी) : गुजरात राज्यातील सुरत येथे 28 ते 31 डिसेंबर दरम्यान झालेल्या राष्ट्रीय जिम्नॅस्टिक स्पर्धेत परभणीच्या खेळाडूंनी भारतामध्ये मानाचा तुरा रोवला.
या स्पर्धेत 14 व 17 वर्षे या दोन्ही गटामध्ये सुवर्णपदक व रौप्य पदक अखंड भारतातून परभणी जिल्ह्यातील खेळाडूंनी मिळवले. त्यामधे प्रज्वल बाळासाहेब आंबोरे व आदित्य नितीन खळीकर अनुक्रमे 14 व 17 वयोगट सुवर्णपदक, पार्थ शिंदे व अभिषेक परमेश्वर शिंदे 14 व 17 वयोगट अनुक्रमे रौप्य पदक पटकावले.
तसेच सीनियर गट रमण संगीतम व साईदीप मठपलू कास्यपदक,च हर्षद जाठोडे टीम चॅम्पियनशिप सुवर्णपदक, दिव्या आवाड, वैष्णवी राऊत आक्रोबाटिक जिम्नॅस्टिक राष्ट्रीय सहभाग म्हणजेच परभणीच्या सर्व खेळाडूंनी चमकदार कामगिरी करत भारताला थक्क करणारा विजय मिळवून दिला. या विजयी खेळाडूंना आंतरराष्ट्रीय कोच प्रदीप लटपटे, संदीप लटपटे व वेदांत मुंडे यांचे मार्गदर्शन लाभले.
परभणी जिल्हा जिम्नॅस्टिक संघटनेचे सचिव उत्तमराव लटपटे, महाराष्ट्राचे सचिव डॉ. मकरंद जोशी, डॉ. पवन भोईर, अॅड. नितीन खळीकर, अॅड. परमेश्वर शिंदे, राजू आव्हाड, बाळासाहेब आंबोरे यांनी राष्ट्रीय स्पर्धेत सहभागी झालेल्या व विजयी झालेल्या खेळाडूंचे अभिनंदन केले.
Sunday, February 8
ताज्या बातम्या:
- ज्येष्ठ पत्रकार नितीन धूत यांना सर्व पत्रकारातर्फे श्रद्धांजली अर्पण
- संत श्री गजानन महाराज प्रगट दिनानिमित्त विविध कार्यक्रम; आत्मोन्नती प्रतिष्ठानचा उपक्रम
- शेतकरी व पशुपालकांना केंद्रबिंदू ठेवून प्रदर्शनाची तयारी करा- पशुसंवर्धन मंत्री पंकजा मुंडे
- मारोतराव लोमटे यांचे निधन
- ज्येष्ठ पत्रकार नितीन धूत यांची उद्या परभणीत शोकसभा
- यशस्वीतेसाठी कठोर परिश्रम आवश्यक- सर्वेश काबरा
- जिल्हा परिषद व पंचायत समिती च्या मतदानासाठी कामगारांना भरपगारी सुट्टी
- केंद्रीय अर्थसंकल्पातून महाराष्ट्राला ऐतिहासिक निधी;, पायाभूत सुविधा व ऊर्जेला नवी दिशा — राज्यमंत्री मेघना बोर्डीकर


