परभणी ( प्रतिनिधी) क्रीडा व युवक सेवा संचालनालय महाराष्ट्र राज्य पुणे यांच्या आदेशान्वये परिपत्रक असतानाही अद्यापही परभणी जिल्हा क्रीडा कार्यालयाच्या वतीने शालेय जिल्हा क्रीडा स्पर्धेचे आयोजनाबाबत परिपत्रक न काढल्यामुळे मा.रघुनाथ गावडे यांना निवेदन देण्यात आले.

परभणी जिल्हा शालेय विनाअनुदानित खेळाच्या स्पर्धा अद्याप पर्यंत सुरु झाल्यानाहीत त्यास्पर्धा सुरु करुन खेळाडुंचे नुकसान टाळावे या मागणीचे निवेदन जिल्हाधिकारी श्री रघुनाथ गावडे यांना देवुन विविध समस्या बाबत चर्चा करताना परभणी जिल्हा शारीरिक शिक्षण शिक्षक महासंघाचे अध्यक्ष रणजीत काकडे , महानगर सचिव पी. आर. जाधव, टेनिव्हाँलीबाँल महाराष्ट्र संघटनेचे राज्य सचिव गणेश माळवे, जिल्हा सचिव प्रशांत नाईक, मुझिकल चेअर संघटनेचे राज्य सचिव टि.के. ठोंबरे , बॉक्सिंग जिल्हा सचिव धनंजय बनसोडे , टेनिस क्रिकेट असो. महेश काळदाते, शिवाजी काकडे ,शाहीद पठाण,कैलास टेहरे, बालाजी मानोलिकर, कष्णा शिंदे , महेश शिंदे , यावेळी शाळा प्रोत्साहन अनुदान वितरण , जिल्हा क्रीडा पुरस्कार वितरण, तालुका क्रीडा संकुलासाठी आलेले साहीत्य तालुक्याला त्वरीत वितरण करावे ,इ, बाबत चर्चा करुन निवेदन देण्यात आले.


