परभणी (प्रतिनिधी) परभणी-हिंगोली या दोन जिल्हयातील भाविकांसाठी परभणी येथे दोन दिवसीय तब्लीगी इज्तेमाचे आयोजन दि.1 व 2 जानेवारी रोजी करण्यात आले होते. कुराण व प्रेषित मोहम्मद पैंगबर यांनी दिलेल्या शिकवणीसह संदेशाचे प्रत्येक मुस्लिम बांधवाने आपल्या दैनंदिन जीवनात आचरण केले पाहिजे, एकमेकांविषयीची प्रेम, व सलोख्याचे नाते ठेवत एकदुसºयाला सहकार्य केले पाहीजे .सदरील इज्तेमामध्ये तब्लीगी जमातचे अध्यक्ष मौलाना सय्यद महेमुद अली यांनी रात्री 8.50 सामूहिक दुवा(प्रार्थना) केल्यानंतर इज्तेमाचा समारोप झाला.
परभणी आणि हिंगोली या जिल्हयातील नागरिकांसाठी सुमारे ८० एकरवर इज्तेमाचे आयोजन करण्यात आले होते. सकाळी फजरच्या नमाज नंतर इज्तेमाला सुरुवात झाली. विशेषत: विविध मौलवींनी विविध विषयात मोलाचे मार्गदर्शन केले. दूसºया सत्रात जोहरच्या नमाजानंतरच्या सत्रात उलमा निशीस्त मौलान मुफ्ती शफीक, मौलाना फुरखान खासमी, मौलाना महेमुद अली आदींनी मोलाचे मार्गदर्शन केले.
देशात व राज्यात शांतता नांदो एकमेकात प्रेम भावना निर्माण व्हावी. ज्यांचे आई-वडील वारलेत त्यांच्यासाठी दुवा करणे तसेच ज्यांचे आई-वडील जिवंत आहेत त्या आई वडीलांची सेवा करण्याची प्रत्येकाला सदबुध्दी देवो, तसेच ज्या ज्या देशात .युध्द सुरु आहे ते बंद व्हावेत,संपुर्ण जगात शांतता प्रस्थापीत होवो, मुस्लिम बांधवानी आपले जीपन कसे जगले पाहिजे, कौटूबिक व सामाजिक स्वास्थ्य कसे राहील या विषयी सविस्तर मार्गदर्शन करण्यात आले. प्रेषित मोहम्मद पैगंबरांनी दिलेल्या संदेशाप्रमाणे प्रत्येक मुस्लिम समाजाने जगावे, इतर समाजाविषीय आदर बाळगावा, तसेच समाजामध्ये जगतांना एक दुसºयाला सहकार्याची भावना ठेवून कोणती कार्य करावे. या इज्तेमासाठी परभणी व हिंगोली जिल्ह्यातील लाखो बाधवांनी पहाटेपासून गर्दी करण्यास सुरवात केली. त्यामुळे हा ८० एकरातील मुख्य मंडपासह संपूर्ण परिसर यामुळे गजबजला होता. यात हिंगोली,औंढा,वसमत, कळमनुरी,आ. बाळापुर, पुर्णा, जिंतूर, मानवत, सोनपेठ,पाथरी, पालम, पुर्णा, गंगाखेड,सेलू,या सह जालना जिल्हयातील नागरिकही उपस्थित होते. मिळेल त्या वाहनाने तब्लिगी इज्तेमाचे स्थळ गाठून दिवसभरातील कार्यक्रमाला हजेरी लावून सहभाग नोंदवला .मुस्लीम बांधवांनी दुसºया दिवशीही दिवसभरात शिस्तीचे प्रदर्शन केले.
दोन्ही जिल्ह्यातील अधिकांश दुकाने बंद होती. परभणी शहरातील व्यापारी व नागरीक दिवसभर आपापले दैनंदिन व्यवहार बाजारपेठेतील व्यवहार पूर्णपणे बंद होते. परभणी शहराच्या चोहोबाजूंनी वाहनांच्या लांब लचक रांगा लागल्याचे दिसून येत होते.
धर्माच्या शिकवणी सोबतच समाजाच्या उन्नती व भविष्य घडविण्यासाठी उलमांनी समोर येण्याची नितांत गरज असल्याचे सांगीतले. इस्लाम धर्माची शिकवण व त्याचे महत्व याची सखोल माहीती प्रत्येक मुस्लीम बांधवास असणे गरजेचे आहे. धर्माची शिकवणी सोबत आधुनिक युगाबद्दल माहीती सांगावी जेणे करून भविष्यात त्यांना अडचणी येणार नाही. मुख्य प्रवाहात राहण्यासाठी इतर भाषा अवगत असणेही तेवढेच म्हत्वाचे असल्याचे मौ.महेमुद यांनी सांगीतले.
यावेळी दोन जिल्हयातून तब्बल अडीच लाख मुस्लीम बांधव उपस्थित असल्याचे बोलले जात आहे.


