पालम (प्रतिनिधी ) शेतकऱ्यांना पिक विमा अग्रीम रक्कम, अतिवृष्टी अनुदान मिळणेसाठी व बोगस पिक विमा भरून विमा घोटाळा करणाऱ्या विमा कंपनीवर गुन्हा दाखल करण्यासाठी महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसच्या वतीने जिल्हाधिकारी यांना पालम तहसीलदारांच्या मार्फत निवेदन देण्यात आले.
यावेळी महाराष्ट्र प्रदेश युवक काँग्रेस सहसचिव ऍड.राहुल हत्तीअंबीरे काँग्रेस तालुकाध्यक्ष कृष्णा भोसले, काँग्रेस नेते अकबर खान पठाण, रिपाई जिल्हाध्यक्ष निवृत्ती हत्तीआंबीरे, तालुका उपाध्यक्ष माधव फाजगे,हबीब चाऊस,अल्पसंख्यांक तालुकाध्यक्ष साबिर भाई कुरेशी, शेतकरी मित्र आबरार भाई काझी, वामन शेंगुले, शेख आबेद,उन्मेष साळवे आदी उपस्थित होते


