परभणी (प्रतिनिधी) आज शाळा महाविद्यालयासाठी विद्यार्थी महत्वाचा केंद्र बिंदु आहे. हाच देशाचा पाया आहे. कोणत्याही देशाची सशक्त जड़न-घड़न शाळा महाविद्यालय तयार होत असते. त्या साठी मानसिक आरोग्य महत्वाचे असते, शारीरिक व बौद्धिक मानसिक आरोग्य हे प्रत्येक व्यक्ति ची महत्वाची संपत्ती आहे. इतर संपत्ती पेक्षा सक्षम आरोग्य महत्वाचे आहे. त्यासाठी वाचन चिंतन आणि लेखन हेच विद्यार्थ्यांचे मानसिक सक्षमतेसाठी व जीवन सुंदरते साठी सतत प्रयत्न करावेत असे प्रतिपादन प्रा. डॉ. नवनाथ सिंगापुरे यानी केले.
स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठ नांदेड व राजर्षी शाहू महाविद्यालय परभणी यांच्या संयुक्त विद्यमाने मौजे ब्राह्मणगांव इथे आयोजित राष्ट्रीय सेवा योजना विशेष युवक शिबिराच्या दूस-या दिवसाच्या दुपारच्या बौद्धिक सत्रात अनेमिया आणि मानसिक आरोग्य या विषयावर ते बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्राचार्य डॉ. विठ्ठल घुले होते. श्री बबन शेळके ‘मी आणि माझी कविता’ डॉ. मोतीराम कदम ‘ग्राम स्वच्छता व श्रमप्रतिष्ठा’ प्रा. आनंद कांबळे ‘समाज सुधारकांची कार्ये’ या विषयाच्या अनुषंघाने समायोजित विचार मांडले. बबन शेळके यांनी नी आई, वडील, प्रेम व्यसन आदि विषयावर काव्य रचना सादर केली. अध्यक्षीय समारोपात डॉ. घुले म्हणाले की विद्यार्थ्यांनी शिबिरात विधिध विषयाचे आकलन व निरीक्षक करुन आपले जीवन समृद्ध करावे. शेवटी’ हिरवा सपन’ व तेवढं मात्र विचारु नका या कविताचे सादरीकरण केले.
दुपारच्या बौद्धिक सत्राचे सूत्रसंचालन कु. श्रद्धा खनपटे हिने केले तर पूजा गुरुवे हीने उपस्थितांचे आभार मानले. यावेळी कार्यक्रमास राष्ट्रीय सेवा योजनाचे विद्यार्थी- विद्यार्थीनी व प्रा. डॉ. कल्याण गोपनर प्रा. योगेश कु-हाडे आदि मान्यवर उपस्थित होते.


