परभणी ( प्रतिनिधी) पथविक्रेता समिती करिता झालेल्या निवडणुकीतून नवनियुक्त सदस्य तसेच शासकीय सदस्य, अशासकीय सदस्य यांची एकत्रित नगरपतविक्रेता समितीची पहिली बैठक आज आयुक्त धैर्यशील जाधव यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली.
यावेळी नगर सचिव विकास रत्नपारखे पोलीस प्रशासनाचे प्रतिनिधी पोलीस निरीक्षक प्रेमप्रकाश माकोडे, बँक प्रतिनिधी जितेंद्रसिंह कुशवाह, नगर रचनाकार चंद्रकांत वडेकर, आरोग्य विभागाचे डॉक्टर कल्पना सावंत यांची व्यासपीठावर उपस्थिती होती. राष्ट्रगीत झाल्यानंतर सर्वप्रथम सर्व नवनियुक्त सदस्यांचे पुष्पगुच्छ देऊन महानगरपालिकेतर्फे आयुक्त धैर्यशील जाधव यांनी स्वागत केले. यानंतर नगर पथक्रेता समितीचे कार्य काय आहेत व शासन अधिनियमानुसार कर्तव्य जबाबदाऱ्या यांची सखोल माहिती आयुक्त धैर्यशील जाधव यांनी सर्व सदस्यांना करून दिली.

यावेळी सदर समितीचे कामकाज महानगरपालिका अधिनियमातील सर्वसाधारण सभेचे कामकाजाच्या नियमानुसारच चालवण्यात यावे याविषयी एकमताने ठराव मंजूर करण्यात आला. त्यानुसार पुढील बैठकीपूर्वी सभेचे कामकाज कशाप्रकारे चालेल याची माहिती लिखित स्वरूपात सदस्यांना देण्यात येईल अशी सूचना आयुक्त यांनी केली.
समितीचे सदस्य मोईन माऊली यांनी गांधी पार्क तसेच मुख्य बाजारपेठेतील 40 वर्षापासूनचे असणारे फळ विक्रेत्यांचे दुकाने तसेच ठेवून नवीन वसाहतींमध्ये फळ विक्रेत्यांच्या दुकाने लावण्यासाठी नवीन धोरणाने कामकाज करावे अशी सूचना केली. तसेच आठवडे बाजार करिता शनिवार बाजार मैदान हे अपुरे पडत असल्यामुळे शहराच्या चार दिशांना चार ठिकाणी आठवडी बाजारा करिता जागा उपलब्ध करून आठवडे बाजाराची विभागणी करावी यामध्ये वसमत रोड, गंगाखेड रोडला गोरक्षण मैदान, दर्गा रोडच्या बाजूला नूतन विद्यामंदिरचे पाठीमागील मैदान तसेच खंडोबा बाजार येथील महानगरपालिकेच्या जागेवर अशा चार ते पाच ठिकाणी आठवडी बाजार भरल्यास गर्दी विभागणी होईल व वाहतुकीचा प्रश्न निर्माण होणार नाही अशी सूचना त्यांनी मांडली.
सदस्य शेख सलीम यांनी फेरीवाल्यांचा परत एकदा सर्वे करून त्यांना प्रमाणपत्र देण्यात यावे तसेच वेंडिंग झोन व नॉन वेंडिंग झोन निश्चित करावेत यांची विभागणी करावी अशी सूचना केली.
सदस्य रामेश्वर आवरगंड यांनी क्रांती चौक भाजी मंडई पुनर्विकसित करावी तसेच शनिवार बाजारात कायमस्वरूपी वोटे निर्माण करावेत व सदर ठिकाणी बसणाऱ्या विक्रेत्यांकडून शुल्क आकारणी करावी याकरिता एखादी एजन्सी नेमावी, काळी कमान येथील भाजी मार्केट विद्यापीठांमध्ये किंवा मग शंभर फूट रस्त्यावरती स्थलांतरित करावे, या समितीच्या कामकाजाकरिता महानगरपालिकेत कार्यालय करता जागा उपलब्ध करावी, अग्रीम बँकेने 50 हजारा ऐवजी दोन लाख रुपये पर्यंत कर्ज पथविक्रेत्यांना द्यावेत, समितीच्या दोन रिक्त जागा लवकरात लवकर भरण्यात याव्यात अशी मागणी व सूचना केल्या.
सुरेश प्रधान यांनी शहरातील पतविक्रेत्यांना ओळखपत्र द्यावेत तसेच आजूबाजूच्या ग्रामीण भागातून येणाऱ्या पतविक्रेत्यांना देखील ओळखपत्र द्यावेत अशी सूचना केली. श्री भराडे यांनी समितीच्या सदस्यांना मानधन देण्यात यावे तसेच राजगोपालचारी उद्यानच्या आत मध्ये खाऊ गल्ली निर्माण करावी अशी सूचना केली. श्री साजिद यांनी पोलीस चौकी ग्रंथालयाच्या बाजूला तसेच जिंतूर रोड येथे पथविक्रेत्यांना जागा उपलब्ध करून द्यावी व स्वच्छता करून द्यावी अशी मागणी केली.
सर्व सदस्यांच्या मागणी नाव सूचनांना उत्तर देताना आयुक्तांनी फेरीवाला सर्वेक्षण व सदस्यांच्या विमा करिता शासनाकडे प्रस्ताव पाठवू, फेरीवाला व ना फेरीवाला परिसर लवकरच घोषित करू तसेच जे जे नियमानुसार शक्य असेल त्यावरती लवकरात लवकर सकारात्मक कार्यवाही करू असे आश्वासन समिती सदस्यांना दिले व आजची बैठक येथे संपन्न झाली असे जाहीर केले.


